शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
2
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
3
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
4
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
5
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
6
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
7
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
8
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
9
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
10
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
11
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
12
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
13
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
14
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
15
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
16
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
17
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
18
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
19
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
20
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?

सिहोऱ्यात एटीएम सेवा विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 05:01 IST

मध्यप्रदेश राज्याच्या सीमेलगत असणाऱ्या सिहोरा गावात विविध बँकाचे जाळे आहेत. सिहोरा आणि गोंदेखारी गावात असणाऱ्या बँका ग्राहकांना सेवा देतात. सिहोरा गावात तीन बँका कार्यरत असून अनेक पतसंस्था आहेत. या बँकीग प्रणालीमुळे कोट्यवधीची उलाढाल होत आहे. बँकाची ग्राहक संख्या लाखोंच्या घरात असतांना सुविधा मात्र नगण्य आहेत. यामुळे अनेक वेळा सुविधा आणि सेवेवरुन बँक प्रशासनासोबत ग्राहकांच्या तक्रारी वाढल्या आहेत.

ठळक मुद्देतिन्ही एटीएम बंदच : निर्जंतुकीकरणाचा आदेश कागदावरच, ग्राहक त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : परिसरातील गावांची मुख्य बाजारपेठ असणाऱ्या सिहोरा गावात असलेले तिन्ही एटीएमध्ये तांत्रिक बिघाड असल्याने ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे. सुरळीत सेवा देण्याकरिता यंत्रणेचेही दुर्लक्ष होत असून त्यामुळे नागरिकातून नाराजीचा सुर आहे.मध्यप्रदेश राज्याच्या सीमेलगत असणाऱ्या सिहोरा गावात विविध बँकाचे जाळे आहेत. सिहोरा आणि गोंदेखारी गावात असणाऱ्या बँका ग्राहकांना सेवा देतात. सिहोरा गावात तीन बँका कार्यरत असून अनेक पतसंस्था आहेत. या बँकीग प्रणालीमुळे कोट्यवधीची उलाढाल होत आहे. बँकाची ग्राहक संख्या लाखोंच्या घरात असतांना सुविधा मात्र नगण्य आहेत. यामुळे अनेक वेळा सुविधा आणि सेवेवरुन बँक प्रशासनासोबत ग्राहकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. बँका ग्राहकांना सेवा आणि सुविधा देण्याचे प्रयत्न करीत आहेत. मात्र या बँकात शासनाचे योजनेअंतर्गत देण्यात येणारी अनुदान योजना, विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीमुळे अनेकदा गर्दी होते. त्यामुळे बँकेत ग्राहकाच्या रांगा लागत आहेत. यामुळे गोंधळ उडत आहेत. ग्राहकांची वाढती गर्दी राहत असल्याने प्रशासकीय कामकाज प्रभावित होत आहे. बँकेत असणारी ग्राहकांची गर्दी टाळण्याकरिता एटीएमची सुरु करण्यात आले. बँक ऑफ इंडिया, जिल्हा सहकारी बँक आणि खाजगी अशी एकुण तीन बँकेची एटीएम आहेत. मात्र यातील दोन एटीएम गेल्या महिनाभरापासून बंद आहेत.बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये वारंवार तांत्रिक बिघाड होेत आहेत. एटीएममध्ये आठवडाभर पैसे नाहीत. कधी पैसे उपलब्ध असले तरी एटीएममध्ये तांत्रिक बिघाडाच्या अडचणी येत आहे. बंद एटीएममुळे ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे. सिहोरा गावात १८ किमी अंतरावरुन ग्राहक पैसे काढण्यासाठी येतात. त्यांना एटीएमची योग्य सेवा मिळत नसल्याने ग्राहकातून नाराजीचा सुर आहे. गोंदेखारी गावात बँक असतांना एटीएम सेवा नाही. यामुळे चुल्हाड, बपेरा, हरदोली, चांदपूर, मांडगी, मुरली, दावेझरी, सोंड्या या लांब पल्ल्यातील गावातील ग्राहक थेट सिहोरा गावात धाव घेत आहेत. त्यामुळे हजारो ग्राहकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. आंतरराज्यीय सीमेवरील बपेरा गावात एटीएम सेवेची ओरड जुनीच आहे. याकडे बँक दुर्लक्ष करीत आहेत. बपेरा गावाचे शिवार मध्यप्रदेशातील सीमावर्ती गावात एटीएम सेवा नाही. यामुळे बपेरा गावातील एटीएमचा लाभ २८ गावातील ग्राहकांना होणारआहे. परंतु यासाठी प्रयत्न होत नाही. एक ना धड भाराभार चिंध्या अशी अवस्था परिसरातील एटीएमची झाली आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.एटीएम सुरक्षा वाऱ्यावरसिहोरा परिसरातील आंतरराज्यीय सिमेवरील असणाऱ्या बँक ऑफ इंडिया शाखेतील एटीएमची सुरक्षा वाऱ्यावर आहे. येथे सुरक्षा गार्डची नियुक्ती करण्यात आलेली नाही. सुरक्षा गार्ड नियुक्ती करण्याची गरज आहे. सुरक्षारक्षक नसल्याने एटीएम व ग्राहकांची सुरक्षा धोक्यात आली आहे.बपेरा आणि चुल्हाड गावात एटीएमची आवश्यकता आहे. याच मार्गाने पर्यटक आणि भाविक चांदपुरात दाखल होतात. एटीएम परिसरातील ग्राहकांना सोईचे असताना याकडे दुर्लक्ष होत आहे.- किशोर राहांगडालेसामाजिक कार्यकर्ताहरदोली गावात एटीएम नसल्याने ग्राहकांना सिहोरा व तुमसरला जावे लागत आहे. अंतर लांब असल्याने गावातच एटीएमची सुविधा दिली पाहिजे.- मुन्ना पारधी,सामाजिक कार्यकर्ता, सिलेगाव

टॅग्स :atmएटीएम