चोरट्यांनी फोडले पोलिसांच्या नजरेतील ‘एटीएम’
By Admin | Updated: December 15, 2014 22:49 IST2014-12-15T22:49:42+5:302014-12-15T22:49:42+5:30
पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या एकोडी येथील स्टेट बँक आॅफ इंडियाच्या ‘एटीएम’ (आॅटोमेटीक ट्रांझिस्ट मनी) मशिनला चोरट्यांनी लक्ष्य केले. चोरट्यांनी ही मशिन फोडली परंतु,

चोरट्यांनी फोडले पोलिसांच्या नजरेतील ‘एटीएम’
एकोडी येथील घटना : कॅमेरे नसल्यामुळे चोरट्यांना शोधणे पोलिसांसमोर आव्हान
साकोली/एकोडी: पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या एकोडी येथील स्टेट बँक आॅफ इंडियाच्या ‘एटीएम’ (आॅटोमेटीक ट्रांझिस्ट मनी) मशिनला चोरट्यांनी लक्ष्य केले. चोरट्यांनी ही मशिन फोडली परंतु, चोरट्यांना एटीएममधून पैसे चोरी करण्यात अपयश आले. असे असले तरी एटीएम मशीनचे लाखोंचे नुकसान झाले आहे. ही घटना काल रविवारला मध्यरात्री घडली.
एकोडी येथे स्टेट बँक आॅफ इंडियाची शाखा आहे. या बँकेच्या समोरच एटीएम मशीन लावण्या आलेली आहे. बँकेचे कामकाज सुरू राहते तोपर्यंत ही एटीएम मशीनही सुरू राहते. बँक बंद झाल्यानंतर ही मशीन बंद करण्यात येते. शनिवार व रविवार हे दोन दिवस सुटी असल्यामुळे ही एटीएम मशीन बंद होती. काल रविवारला मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेत या एटीएम मशीनचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. एटीएम मशीन फोडून त्यातील पैसे चोरण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरांचा हा प्रयत्न फसला. परंतु पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या बँकेतून चोरी होत असेल तर सामान्य माणसांची सुरक्षा पोलीस कसे घेणार हा प्रश्न निर्माण होतो.
आज सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी हिम्मत जाधव, पोलीस निरीक्षक भगवान खारतोडे ताफ्यासह घटनास्थळी पोहचले. त्यांनी घटनेचा पंचनामा करुन श्वानपथकाला पाचारण केले. मात्र चोरट्यांचा शोध लागला नाही.
रात्री एक वाजेदरम्यान एकोडी येथील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. विद्युत पुरवठा कसा खंडीत झाला होता. यामागे चोरट्यांचा हात तर नाही ना यादिशेनेही पोलिसांचा तपास सुरू आहे. (तालुका प्रतिनिधी / वार्ताहर)