सय्यद यांना अटल सन्मान पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 22:14 IST2018-12-19T22:13:52+5:302018-12-19T22:14:11+5:30
माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त दिला जाणारा शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यबद्दलचा विदर्भ स्तरावरील अटल सन्मान पुरस्कार खराशी येथील मुख्याध्यापक मुबारक सय्यद यांना जाहीर झाला आहे.

सय्यद यांना अटल सन्मान पुरस्कार
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त दिला जाणारा शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यबद्दलचा विदर्भ स्तरावरील अटल सन्मान पुरस्कार खराशी येथील मुख्याध्यापक मुबारक सय्यद यांना जाहीर झाला आहे.
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील शाळेत अध्यापनाचे पवित्र कार्य करत समाज, शिक्षक व पालक यांच्या सहकार्याने खराशी शाळेचा नावलौकिक संपूर्ण राज्यातच नाही देश पातळीवर त्यांनी पोहचविले आहे. राज्यात शाळा सिध्दी पायलट उपक्रमातील अग्रगणित शाळा आहे.
कविवर्य सुरेश भट सभागृह नागपूर येथे २० डिसेंबरला केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे व सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या उपस्थित अटल पुरस्कार सन्मानाने मुख्याध्यापक मुबारक सैय्यद यांना सन्मानित करण्यात येईल.