अटल दुचाकी चोर आंधळगाव पोलिसांच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:42 IST2021-08-18T04:42:13+5:302021-08-18T04:42:13+5:30

तक्रारीवरून आंधळगाव पोलिसांनी कलम ३७९ भादवि चा गुन्हा नोंद करून तपासात घेतला. दरम्यान खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीवरून सदर गुन्ह्यातील आरोपी ...

Atal bike thief caught by Andhalgaon police | अटल दुचाकी चोर आंधळगाव पोलिसांच्या जाळ्यात

अटल दुचाकी चोर आंधळगाव पोलिसांच्या जाळ्यात

तक्रारीवरून आंधळगाव पोलिसांनी कलम ३७९ भादवि चा गुन्हा नोंद करून तपासात घेतला. दरम्यान खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीवरून सदर गुन्ह्यातील आरोपी नामे वैभव ऊर्फ विवेक रविंद्र डोंगरे (१९) वर्षे राहणार खळबंद तसेच एक विधिसंघर्षग्रस्त बालक रा. विजयी टोला, दोन्ही ता. जिल्हा गोंदिया यांनी गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यांनी पुन्हा कोणते गुन्हे केले आहे का, याचा तपास केला जात आहे. स्थानिक गुन्हे शाखा गोंदिया व तिरोडा पोलिसांचे मदतीने आंधळगाव पोलिसांनी आरोपी वैभव डोंगरे यास अटक करून त्याचेकडून गुन्ह्यात चोरीस गेलेली मोटर सायकल व चोरी करतेवेळी वापरलेली बजाज पल्सर असे एकूण ४० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ही कार्यवाही पोलीस अधीक्षक वसंत जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, उपविभागीय पोलिस अधिकारी संतोषसिंह बिसेन, यांच्या मार्गदर्शनात आंधळगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सुरेश मट्टामी, हवालदार संजय वाकलकर, राजेश बाभरे, अमोल मस्के, सिद्धेश्वर शेळके, विजेंद्र सिंगनजुडे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

Web Title: Atal bike thief caught by Andhalgaon police