लाखनी तहसील प्रशासनाकडून १६० व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूंची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 05:00 IST2020-04-14T05:00:00+5:302020-04-14T05:00:52+5:30
गरीब व गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले. स्थानिक समाजसेवी संस्था व सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने तालुक्यातील प्रत्येक गावातील गरजवंत लोकांपर्यंत पोहचवून तलाठ्यांमार्फत अन्नधान्य व आवश्यक साहित्याचे वितरण घरापर्यंत करण्यात आले.

लाखनी तहसील प्रशासनाकडून १६० व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूंची मदत
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनी : तालुक्यात लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर तहसील कार्यालयातील आपत्ती व्यवस्था कक्षातर्फे गरीब व गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले. स्थानिक समाजसेवी संस्था व सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने तालुक्यातील प्रत्येक गावातील गरजवंत लोकांपर्यंत पोहचवून तलाठ्यांमार्फत अन्नधान्य व आवश्यक साहित्याचे वितरण घरापर्यंत करण्यात आले.
१० एप्रिलपर्यंत १६० व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात आला. राशन कार्ड नसलेले, निराधार, अपंग, गरीब व गरजू लोक उपाशी राहणार नाही याची काळजी घेण्यात आली. तालुक्यातील राईस मिल असोशिएशन तर्फे प्रत्येक व्यक्तीला १० किलो तांदूळ, परमपूज्य सिंधी पंचायत गुरुद्वारा लाखनी तर्फे आटा, तूरडाळ, तेल, साखर, बिस्कीटे, कच्ची मेमन समाज मुस्लिम मंडळ लाखनी द्वारे मीठ, मिरची, हळद, मसाला, उदबत्ती, साबून, चहापत्ती आदी जिन्नस देण्यात आले. तालुक्यातील अधिकाऱ्यांकडून मोमबत्ती, अगरबत्ती, कंगवा, पेस्ट, कापड, बर्तन आदी साहित्य देण्यात आले. स्थानिक शेल्टर होम व गरजू लोकांना जेवण, चहा, नाश्ता सिंधी समाजातर्फे पुरविण्यात येत आहे. तहसीलदार मल्लीक विराणी यांच्या नेतृत्वात आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे समन्वयक नरेश नवखरे यांचे सहकार्याने तालुक्यातील महसूल विभाग, पंचायत समिती लाखनी नगरपंचायतचे सर्व कर्मचाऱ्यांनी तसेच लाखनीतील उदार मनाने सहकार्य व मदत करणाºया लोकांमुळे तालुक्यातील प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत मदत घेऊन तालुका प्रशासनाला पोहचता येत आहे.
लाखनीतील सर्वधर्मसमभावाचे ब्रिद जोपासणाऱ्या उदार, दातृत्व व्यक्तीमुळे प्रत्येकाला मदत करता आली आहे. एकीचे बळ जगण्याचे सामर्थ्य निर्माण करून देत आहे. कोरोनामुक्तीचा संघर्ष सुरु असताना मदतीचा हात पुढे करणाºया संस्था व व्यक्तींना बघून तेथे कर माझे जुळती असे म्हणावे वाटते.
-मल्लीक विराणी, तहसीलदार, लाखनी.