रेती तस्करांच्या खबऱ्यावर प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:44 IST2020-12-30T04:44:42+5:302020-12-30T04:44:42+5:30

आशिष पांडूरंग परशुरामकर (२६) असे जखमीचे नाव आहे. साेमवारी रात्री ताे अर्जुनी माेरगाव तालुक्यातील कान्हळगाव - बुधेवाडा मार्गावर रेती ...

Assassination on the news of sand smugglers | रेती तस्करांच्या खबऱ्यावर प्राणघातक हल्ला

रेती तस्करांच्या खबऱ्यावर प्राणघातक हल्ला

आशिष पांडूरंग परशुरामकर (२६) असे जखमीचे नाव आहे. साेमवारी रात्री ताे अर्जुनी माेरगाव तालुक्यातील कान्हळगाव - बुधेवाडा मार्गावर रेती तस्करांसाठी पाळत ठेवून हाेता. त्यावेळी अचानक एका सुमाे वाहनातून आलेल्या सात ते आठ तरुणांनी त्याच्यावर हल्ला केला. त्याला वाहनातून खाली खेचून लाठीकाठी लाेखंडी राॅड व पेचकशने मारहाण केली. या घटनेत आशिष गंभीर जखमी झाला. त्याला घटनास्थळावर साेडून हल्लेखाेर पसार झाले. काही वेळानंतर आशिष कसाबसा जीव वाचवित घटनेची माहिती नागरिकांना दिली. त्याला एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तक्रारीवरुन लाखांदूर पाेलीस ठाण्यात सात ते आठ आराेपींचा विराेधात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र घटनास्थळ गाेंदिया जिल्ह्यातील असल्याने अजुर्नी माेरगाव पाेलिसांकडे मर्ग करण्यात आला आहे.

Web Title: Assassination on the news of sand smugglers