आस्थेने चौकशी करुन दिली सन्मानाची वागणूक
By Admin | Updated: September 9, 2014 00:09 IST2014-09-09T00:09:38+5:302014-09-09T00:09:38+5:30
एरव्ही अधिकारी कामाचे काय तेवढे बोला एवढं बोलतात. काम करून, नाही करून मोकळे होतात. परंतु मोहाडी तहसील कार्यालयात वेगळाच अनुभव दृष्टीस पडला. कुटुंबप्रमुखांना गमावलेल्या महिलांना

आस्थेने चौकशी करुन दिली सन्मानाची वागणूक
औचित्य धनादेश वाटपाचे : प्रकरण निराधार योजनेच्या मानधनाचे
मोहाडी : एरव्ही अधिकारी कामाचे काय तेवढे बोला एवढं बोलतात. काम करून, नाही करून मोकळे होतात. परंतु मोहाडी तहसील कार्यालयात वेगळाच अनुभव दृष्टीस पडला. कुटुंबप्रमुखांना गमावलेल्या महिलांना तहसीलदार कल्याण डहाट यांनी सन्मानाने बसविले. आस्थेने विचारपूस केली. एवढंच नाही तर त्यांना चहा पाजून आपल्या सहृदयतेचा परिचय दिला.
औचित्य होते, मोहाडी तहसील कार्यालयात राष्ट्रीय सामाजिक, कौटुंबिक अर्थसहाय्य योजनेद्वारे विधवा महिलांना धनादेश वाटपाचा. शनिवारी तलाठ्यांमार्फत धनादेश स्वीकारण्यासाठी आधार गेलेल्या महिलांना तहसील कार्यालयात बोलावण्यात आले होते. तहसील कार्यालयाच्या त्या महिला तहसीलदार यांची प्रतिक्षा करीत पडवीत बसून होत्या. फावल्या वेळात एकमेकांच्या दु:खाची वाटणी करीत होत्या.
एक महिला आपलं तान्ह बाळ घेऊन मिळणाऱ्या अर्थसहाय्यासाठी आपली होती. विविध गावातून त्या विधवा ताटकळत बसून होत्या. त्यांची प्रतीक्षा संपली. एकाच वेळी आमदार अन् तहसीलदार आले. साहेब आल्याने विधवांच्या चेहऱ्यावरची निराशा गेली होती.
तहसीलदारांनी लगेच त्या महिलांना दालनात बोलावले. त्यांना बसायला खुर्च्या दिल्या. अन् सरळ त्या निराधार महिलांनी तहसीलदारांनी संवाद साधला.
एजंटामार्फत तुम्हाला सांगण्यात आलं का, कुणी पैसे मागितले का, याची चौकशी केली. संजय गांधी निराधार योजनेतून अर्थसहाय्य तुम्हाला मिळतं का अशीही विचारणा केली.
पण उपस्थित असणाऱ्या अठरा महिलांपैकी एकीलाही संजय गांधी निराधार योजनेतून अर्थसहाय्य मिळत नसल्याचे लक्षात आले. कुटुंब प्रमुख अध्यापेक्षा जास्त आम आदमी विमा काढला गेला नाही. एक अधिकारी जनतेला विविध योजनेचा लाभ कसा मिळेल यासाठी धडपडतोय. पण महसूल विभागातील कणा असलेले तलाठी मात्र शासकीय योजना गरीबांपर्यंत कशी जाईल याची किंचीतही पर्वा करीत नसल्याचे लक्षात आले.
एका लाभार्थ्यांचे २००९ पासून अर्थसहाय्य योजनेसाठी फार्म तलाठ्यांकडून तहसील कार्यालयात पाठविण्यात आला. पण आज पर्यंत तो फार्म मंजूर - नामंजूर याचा सोक्षमोक्ष लागला नसल्याचे निदर्शनास आले. त्या शिवाय अनेक संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, वृद्धापकाळ योजनेचे बरेच फॉर्म अडगळीत पडल्याचे तसेच गहाळ झाल्याचे तहसीलदार यांच्या निर्दशनास आणून देण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)