आशा सेविका खऱ्या समाजसेविका

By Admin | Updated: March 6, 2016 00:23 IST2016-03-06T00:23:38+5:302016-03-06T00:23:38+5:30

स्त्री हीच खरी सेवा देऊ शकते, स्त्रीच्या हातात खूप मोठी शक्ती आहे आणि आशा स्वयंसेविका ही एक स्त्री आहे.

Asha Seva is a true social activist | आशा सेविका खऱ्या समाजसेविका

आशा सेविका खऱ्या समाजसेविका

भाग्यश्री गिलोरकर यांचे प्रतिपादन : सर्वोत्कृष्ठ आशा, गटप्रवर्तकांचा मेळावा
भंडारा : स्त्री हीच खरी सेवा देऊ शकते, स्त्रीच्या हातात खूप मोठी शक्ती आहे आणि आशा स्वयंसेविका ही एक स्त्री आहे. त्यामुळे तीच समाजाची व देशाची खरी सेवा करू शकते. जेएसवायच्या केसेससाठी बीपीएलची अट रद्द करण्याबाबत पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर यांनी दिली. जिल्हास्तरीय सर्वोत्कृष्ट आशा व गटप्रवर्तक पारितोषिक मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.
भंडारा जिल्हा परिषद व राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या विद्यमाने जिल्हास्तरीय सर्वोत्कृष्ट आशा व गटप्रवर्तक पारितोषिक मेळावा घेण्यात आला. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजेश डोंगरे होते. अतिथी म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.विजय डोईफोडे, जी.आर.सी.एच. अधिकारी डॉ.प्रशांत उईके, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ.श्रीकांत आंबेकर, डॉ. एस.के. शहारे, डॉ.डी.आर. लक्षशेट्टीवार उपस्थित होते.
या कार्यक्रमाला जिल्ह्यातील ६०० आशा व गट प्रवर्तक उपस्थित होते. आशा योजनेंतर्गत जिल्हास्तरावरील प्रथम पुरस्कार रेखा कुंभलकर, द्वितीय पुरस्कार मिना बोरघरे यांना मिळाला. ७ तालुक्यातून ७ आशांना प्रथम, द्वितीय पुरस्कार तसेच सर्व ३३ प्राथमिक आरोग्य केंद्रातून प्रथम येणाऱ्या जिल्ह्यातील ३३ आशांना प्रथम पुरस्कार म्हणून प्रत्येकी रोख रक्कम देण्यात आले.
पुरस्कार प्राप्त सर्व आशांना आरटीजीएस द्वारे पुरस्कार राशी, प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील आशांनी उत्कृष्ट काम केले आहे त्यांना नावीन्यपूर्ण कार्यांतर्गत प्रथम पुरस्कार रेखा बरडे, संगीता बांगरे तर द्वितीय पुरस्कार वनिता पंचबुद्धे, नंदा चवडे, प्रा.आ. केंद्र केसलवाडा यांना आरटीजीएसद्वारे पुरस्कार राशी, प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. सर्वोत्कृष्ट गटप्रवर्तक प्रथम पुरस्कार कांचन मेश्राम, द्वितीय पुरस्कार मनीषा डोंगरवार तर तृतीय पुरस्कार इंदिरा सिरारी यांना आरटीजीएसद्वारे पुरस्कार राशी, प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्र बेटाळा व देव्हाडी येथील आशांचा जिल्हास्तरावर प्रथम व द्वितीय क्रमांक आल्यामुळे त्यांचे प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांचे शाल, श्रीफळ, प्रशस्तीपत्र व शिल्ड देऊन तर त्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील गटप्रवर्तक व तालुक्यातील तालुका समुह संघटक यांना गौरविण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेश डोंगरे म्हणाले, पुढील अर्थसंकल्पीय वर्षात जिल्हा निधीतून आशांकरिता नावीन्यपूर्ण योजना व साहित्य देण्याबाबत आश्वासन दिले. प्रास्ताविक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.विजय डोईफोडे यांनी केले. संचालन डॉ.शांतीवन लुंगे, चंद्रकुमार बारई यांनी तर आभारप्रदर्शन जिल्हा साथरोग अधिकारी डॉ.श्रीकांत आंबेकर यांनी केले.
कार्यक्रमाकरिता एन.आर. पाखमोडे, पी.एम. डब्ल्यू. पंचायत समिती लाखनी, डॉ.बी.एस. मस्के जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी, डॉ. भास्कर खेडीकर जिल्हा आयुष अधिकारी, मनीष सेलोकर, गणेश टेंभुर्णे, किशोर अम्रृतकर, प्रदीप दहिवले, सचिन मते, दमयंती कातुरे, संगीता गोंडाणे यांच्यासह सर्व तालुका समुह संघटक व गटप्रवर्तक यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)

Web Title: Asha Seva is a true social activist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.