कला महाविद्यालयाब स्वामी विवेकानंद जयंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:29 IST2021-01-14T04:29:00+5:302021-01-14T04:29:00+5:30

जवाहरनगर : तुलसी बहुउद्देशीय शिक्षण संस्था तुमसरद्वारा संचालित कला व वाणिज्य पदवी महाविद्यालय जवाहरनगर येथील राष्ट्रीय सेवा योजना ...

Arts College Swami Vivekananda Jayanti | कला महाविद्यालयाब स्वामी विवेकानंद जयंती

कला महाविद्यालयाब स्वामी विवेकानंद जयंती

जवाहरनगर : तुलसी बहुउद्देशीय शिक्षण संस्था तुमसरद्वारा संचालित कला व वाणिज्य पदवी महाविद्यालय जवाहरनगर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने स्वामी विवेकानंद यांची जयंती युवादिन म्हणून व राष्ट्रमाता जिजाऊ यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर अजयकुमार मोहबंसी होते. याप्रसंगी विभागीय रोहियो समन्वयक प्राध्यापक विजय गणवीर, प्राध्यापक एम.एस. नाकाडे, अधीक्षक ललित कुमार ठाकूर उपस्थित होते. याप्रसंगी अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉक्टर अजयकुमार मोहनबसी यांनी स्वामी विवेकानंद व राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. संचालन प्रास्ताविक व सूत्रसंचालन कार्यक्रम अधिकारी डॉक्टर आर.एन. मानकर यांनी केले. आभार प्राध्यापक विजय गणवीर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्राध्यापक प्रवीण देऊळकर, डॉक्टर साधना वाघाडे, राजेश वाघमारे, जयंत पवार, दिलीप शेंडे यांनी सहकार्य केले.

Web Title: Arts College Swami Vivekananda Jayanti