स्पर्धेतूनच कलावंत जन्माला येतो
By Admin | Updated: December 27, 2015 00:54 IST2015-12-27T00:54:58+5:302015-12-27T00:54:58+5:30
ग्रामीण भागात उत्तम कलावंत आहेत. परंतु व्यासपीठ उपलब्ध होत नाही त्यामुळे त्यांना लोकांसमोर कला साकार करणारी संधी उपलब्ध होत नाही.

स्पर्धेतूनच कलावंत जन्माला येतो
पवनीत कार्यक्रम : वसंत एंचिलवार यांचे प्रतिपादन
पवनी : ग्रामीण भागात उत्तम कलावंत आहेत. परंतु व्यासपीठ उपलब्ध होत नाही त्यामुळे त्यांना लोकांसमोर कला साकार करणारी संधी उपलब्ध होत नाही. विदर्भ पवनी ग्रुपतर्फे आयोजित गायन स्पर्धेच्या माध्यमातून जिल्ह्यातील गायक कलावंत शोधल्या जाणार आहे. हा स्तुत्य उपक्रम असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अॅड. वसंत एंचिलवार यांनी केले.
विदर्भ पवनी ग्रुपतर्फे संभाजी चुटे रंगमंदिराचे पटांगणावर स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी अध्यक्षस्थानी लाखांदूरचे बंटी सहजवानी होते.
अतिथी म्हणून जिल्हा परिषदचे माजी सदस्य मोहन पंचभाई, नगर परिषद उपाध्यक्ष डॉ. विजय ठवकर, पंचायत समिती सदस्य तोमेश्वर पंचभाई, आझाद शेतकरी संघटनेचे संस्थापक किशोर पंचभाई, डॉ. विक्रम राखडे, पंचायत समिती सदस्य बंडू ढेंगरे, पप्पु रेवतकर, राम भेंडारकर, अरविंद काकडे, अशोक पारधी, प्रशांत पिसे, माजी नगराध्यक्ष मोहन सुरकर, नगरसेवक नरेश बावनकर, राजेश तलमले, अनिल धकाते, ग्रुपचे अध्यक्ष जगदिश ईटानकर, सचिव अनिल लेंडे व सहस्त्रगण यावेळी उपस्थित होते. ३० स्पर्धकांनी स्पर्धेत भाग घेवून सुगम गित दोन फेऱ्यात सादर केले. तुमसर येथील प्रिंस चंद्रकांत मेरूगवार प्रथम पारितोषिकाचा मानकरी ठरला.
आसगाव येथील बाल गायक पिकोसा विनोद मोहरकर हीने द्वितीय पारितोषिक पटकाविले.
तृतीय पारितोषिक अक्षय गौतम राऊत भिवापूर व तुषार किसन मानकर शिवनी यांना विभागून देण्यात आले. अरविंद काकडे, तोमेश्वर पंचभाई, किशोर पंचभाई व डॉ. अनिल धकाते यांचे हस्ते पारितोषिक वितरीत करण्यात आले.
प्रास्ताविक विदर्भ पवनी ग्रृपचे उपाध्यक्ष विश्वपाल हजारे यांनी तर संपूर्ण स्पर्धेचे सुत्रसंचालन भक्तराज गजभिये यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)