भगवान बुद्धांच्या अस्थिकलशाचे आगमन
By Admin | Updated: October 14, 2015 00:36 IST2015-10-14T00:36:51+5:302015-10-14T00:36:51+5:30
इ.स. पूर्व ४८३ मध्ये गौतम बुद्धांचे कुशीनगर येथे महापरिनिर्वाण झाल्यानंतर त्यांच्या अस्थिचे आठ समान भागात निरनिराळ्या ठिकाणी वितरण करून स्तुप उभारण्यात आले.

भगवान बुद्धांच्या अस्थिकलशाचे आगमन
भंडारा : इ.स. पूर्व ४८३ मध्ये गौतम बुद्धांचे कुशीनगर येथे महापरिनिर्वाण झाल्यानंतर त्यांच्या अस्थिचे आठ समान भागात निरनिराळ्या ठिकाणी वितरण करून स्तुप उभारण्यात आले. त्याच पवित्र अस्थिधातूंचे १५ आॅक्टोबरला सकाळी ९ वाजता भंडारा शहरात आगमन होत आहे.
शहरातील शास्त्री चौकातील साखरकर सभागृहात सायंकाळी ४ वाजेपर्यंत हे अस्थिकलश जनतेच्या दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. श्रीलंकेतून येणाऱ्या या अस्थिधातू कलशाचे रथातून आगमन होणार असून शहरातील प्रमुख मार्गाने ते साखरकर सभागृहात पोहोचणार आहे. कलशाचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन अमृत बन्सोड, रुपचंद रामटेके, डी.एफ. कोचे व बौद्ध विहार समिती, आंबेडकरी संघटनांनी केले आहे. (प्रतिनिधी)