तुमसर येथे पाच हजारांची लाच स्वीकारणारा जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:40 IST2021-07-14T04:40:36+5:302021-07-14T04:40:36+5:30
देवराम हरिराम पंचबुद्धे (३३, रा. कोष्टी) असे लाच स्वीकारणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. तो नेहमी तुमसर तहसील कार्यालयाच्या परिसरात असायचा. ...

तुमसर येथे पाच हजारांची लाच स्वीकारणारा जेरबंद
देवराम हरिराम पंचबुद्धे (३३, रा. कोष्टी) असे लाच स्वीकारणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. तो नेहमी तुमसर तहसील कार्यालयाच्या परिसरात असायचा. ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांना तहसीलची कामे करू देतो म्हणून त्यांच्याकडून पैसे उकळायचा. अशातच चार व्यक्तींच्या श्रावणबाळ योजनेचे आणि एका व्यक्तीचे राष्ट्रीय वृद्धापकाळ योजनेचा लाभ तहसील कार्यालयातून मिळवून देण्यासाठी त्याने पाच हजार रुपयांची मागणी केली. नवेगाव येथील व्यक्तीने याबाबत भंडारा लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. यावरून मंगळवारी तहसील कार्यालय परिसरात सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून पाच हजार रुपयांची लाच घेताना त्याला रंगेहाथ पकडण्यात आले.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद तोतरे, भंडारा पोलीस उपअधीक्षक महेश चाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी, राजेंद्र कुरूडकर, कोमल बनकर, सुनील हुकरे, कृणाल कडव, चेतन पोटे यांनी केली. या कारवाईने एकच खळबळ उडाली.