भवनाची नासधूस करणाऱ्यांना अटक करा
By Admin | Updated: July 3, 2016 00:30 IST2016-07-03T00:30:18+5:302016-07-03T00:30:18+5:30
दादर कामा मुंबई येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाची नासधुस करणाऱ्यांना ताबडतोब अटक करण्यात यावे,

भवनाची नासधूस करणाऱ्यांना अटक करा
साकोली : दादर कामा मुंबई येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाची नासधुस करणाऱ्यांना ताबडतोब अटक करण्यात यावे, अशी मागणी समता सैनिक दल साकोलीतर्फे तहसीलदारामार्फत मुख्यमंत्री यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
निवेदनानुसार, दादर मुंबई येथे राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर याांचे निवासस्थान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे या देशाचे शिल्पकार आहेत. त्यामुळे त्यांचे निवासस्थान राष्ट्रीय संपत्ती समजून देखरेख व संरक्षण करण्याची संपूर्ण जबाबदारी ही शासनाची आहे. ज्यांनी हा देश घडविला त्यांच्या निवास स्थानाची नासधूस करणे हा या देशाच्या घटनाकाराचा व या देशाचा अपमान आहे. काही समाजकंटकाने पूर्व नियोजित कटकारस्थान रचून २५ च्या मध्यरात्री बुलडोजरने डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन पाडण्याचे कुटील कारस्थान केले. परंतु शासन व प्रशासनाने या बाबतीत जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे डॉ. आंबेडकर भवनाची नासधुस करणाऱ्याविरूद्ध कोणतीही कार्यवाही केलेली नाही. राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. आंबेडकर यांच्या निवासस्थानाची नासधुस करणाऱ्यांना ताबडतोब अटक करून कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.
शिष्टमंडळात समता सैनिक दलचे तालुका प्रमुख बाबुराव मेश्राम, निशा राऊत, प्रतिभा कोटांगले, गेडाम, सविता शहारे, ज्योती शहारे, गायत्री टेंभुर्णे, विभांता वैद्य, व्ही.आर. मेश्राम, मेश्राम, ज्योती शहारे आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)