उर्वरित आरोपींना अटक करा
By Admin | Updated: September 2, 2015 00:28 IST2015-09-02T00:28:07+5:302015-09-02T00:28:07+5:30
राष्ट्रवादीचे नगर सेवक प्रशांत उके याच्यावर १२ आॅगस्ट रोजी प्राणघातक हल्ला झाला.

उर्वरित आरोपींना अटक करा
वाहिली सामूहिक श्रद्धांजली : सर्वपक्षीय नगरसेवकांचे निवेदन
तुमसर : राष्ट्रवादीचे नगर सेवक प्रशांत उके याच्यावर १२ आॅगस्ट रोजी प्राणघातक हल्ला झाला. ह्ल्ल्यात सहभागी आरोपी अजुनही मोकाटच असुन तात्काळ पोलिसांनी आरोपींना अटक करण्यासंबंधीचे निवेदन सर्व पक्षीय नगरसेवकांनी पोलिसांना सोपविले. तत्पूर्वी उपचारादरम्यान अकस्मात नगरसेवकाचा निधन झाल्याने नगरपरिषदेच्या सभागृहात सामुहिक श्रध्दांजली वाहण्यात आली.
नगरसेवक प्रशांत उके यांच्यावर चाकुने हल्ला करुन गोळीवर ही करण्यात आला. त्यावेळी हल्ल्यात सहभागी ८ ते १० आरोपींचे नावे जखमी अवस्थेत नगरसेवकाने पोलिसांना सांगितले होते. मात्र त्यातील फक्त ५ आरोपींना अटक करण्यात येवून पोलिसांनी तपास बंद झाल्यागत केला. दरम्यान मधुमेहाने आजारी नगरसेवकानी चाकुने केलेली जखम दिवसेंदिवस वाढत जात असल्याने १९ दिवस झुंज देऊनसुध्दा उपचारादरम्यान अखेर ३१ आॅगस्ट रोजी अकस्मात मृत्यू झाला.
त्यामुळे तुमसर शहर हळहळून गेला असुन नगरसेवकाचे मारेकरी अद्यापही मोकाट असल्याने नागरिकांत रोष दिसून येताच नगर परिषदेने विशेष सभेचे आयोजन करुन सर्वप्रथम नगरसेवक प्रशांत उके यांना सर्वपक्षीय श्रध्दांजली वाहण्यात आली व नंतर पोलिसांना निवेदन देवून नगरसेवकांचे मारेकऱ्याना तात्काळ अटक करण्याची मागणी केली. यावेळी नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे, माजी नगराध्यक्ष विजय डेकाटे, मुख्याधिकारी चंद्रशेखर गुल्हाने, न.प. उपाध्यक्षा सरोज भुरे, नगरसेवक विजया चोपकर, कविता साखरवाडे, शाम धुर्वे, दिलीप भोंडेकर, मिता गाढवे, शिला धार्मिक, शालिनी पेढे, लक्ष्मीकांत सलामे, आशिष कुकडे, राजेश देशमुख, सलाम तुरक, सविता ठाकरु, दिपक कठाने, सह संदीप पेंठे, शैलेश साखरवाडे, निशिकांत पेटे, तिलक गजभिये, अंकुरसिंग व अन्य गणमान्य नागरिक उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)