पवनी तालुक्यात मुद्रांक विके्रत्यांची मनमानी
By Admin | Updated: July 9, 2014 23:19 IST2014-07-09T23:19:00+5:302014-07-09T23:19:00+5:30
सद्याला सर्वत्र शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याचे शैक्षणिक कामात सुरूवात झाली आहे. शालेय शिक्षण प्रमाणपत्र घेण्यासाठी मुद्रांक व स्टॅम्प टिकीटाची अत्यंत गरज असते. यात जातीचे प्रमाणपत्र,

पवनी तालुक्यात मुद्रांक विके्रत्यांची मनमानी
पालोरा/चौ : सद्याला सर्वत्र शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याचे शैक्षणिक कामात सुरूवात झाली आहे. शालेय शिक्षण प्रमाणपत्र घेण्यासाठी मुद्रांक व स्टॅम्प टिकीटाची अत्यंत गरज असते. यात जातीचे प्रमाणपत्र, तहसीलदारांचा दाखला, राशनकार्ड वेगळे, नवीन राशनकार्ड, उत्पनाचा दाखला, रहिवासी दाखला, प्रगत उन्नती दाखला आदी कामे सुरू आहेत. याकरिता प्रत्येक अर्जदाराला मुद्रांक व स्टॅम्प तिकीटची आवश्यकता असते. मात्र येथील मुद्रांक विक्रेते आपला मनमर्जी कारभार करून घरूनच मुद्रांकाची डबल किंमत घेवून विक्री करीत आहेत.
मुद्रांक विक्रेते संबंधित विभागाला चालाण भरून मुद्रांकाची मागणी करतात. मात्र मुद्रांकाची उचल करीत नाही. दिवसभर मुद्रांकाची कृतीम टंचाई दाखवून जनतेची दिशाभूल करीत आहेत. सायंकाळी मुद्रांकाची उचल करून घरूनच विक्री केल्या जात आहे. मुद्रांक विकत घेण्यासाठी दिवसभर नागरिकांची लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहे. मात्र संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे. ५ रूपये स्टॅम्प तिकीट ६० रूपये, १०० रूपयाचा मुद्रांक २०० रूपयेयाप्रमाणे तहसील कार्यालयाच्या पटांगणावर खुलेआम विक्री केली जात आहे. याकडे मात्र सर्वांनी डोळे बंद केले आहे. याचा विपरीत परिणाम मात्र जनतेला सहन करावा लागत आहे. या तहसील कार्यालयात बोगस अर्जनीसचा भरणा आहे. यांच्याकडून मनमर्जीपणे जनतेकडून कामाच्या निमित्त्याने पैशाली लूट करीत आहेत. मुद्रांक विक्रेत्याच्या दबंगशाहीने जनता त्रस्त झाली आहे.
तहसीलदार व मुद्रांक विक्रेते यांच्यासोबत मिलीभगत तर नाही ना असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. मुद्रांक कार्यालयात भेट दिली असता त्यांनी सांगितले की, आमच्या कार्यालयातून सुरळीत मुद्रांकाचा पुरवठत्त होत आहे. याला आम्ही जिम्मेदार नाही. संबंधित विभागाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी जनतेनी केली आहे. (वार्ताहर)