आठ विद्यार्थ्यांना सहा लाख रुपयाचे अर्थसहाय्य मंजूर
By Admin | Updated: February 28, 2016 00:57 IST2016-02-28T00:57:27+5:302016-02-28T00:57:27+5:30
विविध घटनांमध्ये मृत पावलेल्या आठ विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रत्येकी ७५ हजार याप्रमाणे एकूण सहा लाख रुपयांचे ...

आठ विद्यार्थ्यांना सहा लाख रुपयाचे अर्थसहाय्य मंजूर
मदतीची घोषणा : अपघात सानुग्रह अनुदान योजना
भंडारा : विविध घटनांमध्ये मृत पावलेल्या आठ विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रत्येकी ७५ हजार याप्रमाणे एकूण सहा लाख रुपयांचे अर्थसहाय्य जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी राजीव गांधी विद्यार्थी सानुग्रह अनुदान योजनेद्वारे मंजूर केले.
यामध्ये जिल्हा परिषद पुर्व माध्यमिक शाळा आंबागड ता. तुमसर येथील चौथ्या वर्गात शिकणारी विद्यार्थिनी सानिया ठाकरे हिचा वाहन पडून मृत्यू झाला. तुळशीरामजी तितीरमारे हायस्कुल आंबागड ता. तुमसर येथील आठव्या वर्गात शिकणारा राजकुमार टेकाम याचा अपघाताने मृत्यू, याच शाळेतील १० व्या वर्गात शिकणारा विद्यार्थी सुनील वाढवे याचा अपघाताने मृत्यू, ममता पूर्व माध्यमिक शाळा येरली ता. तुमसर येथील ५ व्या वर्गात शिकणारा विद्यार्थी विशाल पटले याचा अपघाताने मृत्यू, जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा सेलोटी ता. लाखनी येथील ५ व्या वर्गात शिकणारा विद्यार्थी कृपाल फसाटे याचा वाहन अपघाताने च, तिरुपती विद्यालय माडगी टेकेपार ता. भंडारा येथील १२ व्या वर्गात शिकणारा विद्यार्थी अविनाश नागापुरे याचा साप चावल्याने मृत्यू, तुळशीरामजी तितीरमारे हायस्कूल आंबागड ता. तुमसर येथील नवव्या वर्गातील विद्यार्थी अक्षय मेश्राम याचा वाहन अपघाताने मृत्यू, प्रकाश हायस्कूल अडयाळ ता. पवनी येथील ११ व्या वगार्तील हर्षल बोदलकर याचा वाहन अपघाताने मृत्यू झालेल्या या आठ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. अपघातामध्ये मृत्यू पावलेल्या विद्यार्थ्यांच्या शाळांच्या मुख्याध्यापकांनी आठ दाव्यांकरिता राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेद्वारे अर्थ सहाय्य मिळण्यासाठी दावे दाखल केले होते. या प्रस्तावांवर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अपघातामध्ये मृत पावलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रत्येकी ७५ हजार रुपये प्रमाणे एकूण ६ लाख रुपयांचे अर्थ सहाय्य मंजूर केले. (नगर प्रतिनिधी)