महिला रूग्णालयाला मंजूरी

By Admin | Updated: June 11, 2017 00:15 IST2017-06-11T00:15:14+5:302017-06-11T00:15:14+5:30

येथील बहूप्रतिक्षित महिला रूग्णालयाला अखेर ६ जूनला मंजूरी मिळाली आहे.

Approval of women's hospital | महिला रूग्णालयाला मंजूरी

महिला रूग्णालयाला मंजूरी

नरेंद्र भोंडेकर यांची माहिती : ४४ कोटींचा खर्च अपेक्षित, महिनाभरात भूमिपूजन
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : येथील बहूप्रतिक्षित महिला रूग्णालयाला अखेर ६ जूनला मंजूरी मिळाली आहे. उच्चस्तरीय समितीने या रूग्णालयाच्या प्रस्तावाला मंजूरी दिली असून यासाठी ४३ कोटी ८४ लाख ८८ हजार रूपये मंजूर केले आहे. यातून सुसज्ज रूग्णालय उभारण्यात येणार असून याचे उद्घाटन महिनाभरात करण्यात येणार असल्याची माहिती माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी आज शनिवारला पत्रपरिषदेत दिली.
महिला रूग्णांना सुविधा मिळाव्या यासाठी भंडारा येथे महिला रूग्णालयाची निर्मिती करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पडून होता. माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी वेळोवळी हा मुद्दा रेटून धरला. दरम्यान तांत्रिक अडचणींमुळे महिला रूग्णालयाचा प्रस्ताव थंडबस्त्यात होता. यासाठी उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली होती. ५ कोटींवरील निधीच्या बांधकामाच्या मंजुरीचा प्रस्ताव उच्चस्तरीय समितीकडे वर्ग करण्यात आला होता. यासाठी नरेंद्र भोंडेकर यांनी हा मुद्दा पालकमंत्री डॉ. दिपक सावंत यांच्या माध्यमातून शासनाकडे लावून धरला होता.
या रूग्णायलासाठी ४३ कोटी ८४ लाख ८८ हजार रूपये मंजूर करण्यात आलेले आहे. रूग्णालयाचे भूमिपूजन महिनाभरात होणार असल्याचीही माहिती भोंडेकर यांनी यावेळी दिली. यावेळी पंचायत समिती उपसभापती ललीत बोंद्रे, शहरप्रमुख सुर्यकांत इलमे, अनिल गायधनी, सुरेश धुर्वे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

पवनी रूग्णालयाचा मार्ग मोकळा
पवनी येथील वाढती लोकसंख्या लक्षात घेता, येथे उपजिल्हा रूग्णालयाची मागणी करण्यात येत होती. हे रूग्णालय विशेष बाब म्हणून मंजूर करण्यात येत आहे. रूग्णालयाच्या प्रस्तावातील तांत्रिक अडचणी पूर्ण करण्यात आलेल्या आहे. येत्या दोन-तीन दिवसात पवनी रूग्णालयाचा मार्ग मोकळा होत आहे.
विरोधकांमुळे मिळाले प्रोत्साहन
महिला रूग्णालयाला मंजूरी नाही किंवा त्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने प्रस्ताव बारगडला, असे नेहमी विरोधकांनी वावळ्या उठविल्या. यामुळे खचून न जाता त्यातून मिळालेल्या प्रोत्साहनामुळे रूग्णालयासाठी धावपाळ केली. वावळ्यांमुळे जिद्दीने कामाला लागलो, ते आता पूर्णत्वास येत आहे.

Web Title: Approval of women's hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.