रेती घाट लिलावांना मंजुरी नाकारणार

By Admin | Updated: October 17, 2015 01:16 IST2015-10-17T01:16:46+5:302015-10-17T01:16:46+5:30

मागीलवर्षी रेतीघाटांना मंजुरी देण्यात आली असली तरी, मुदत संपली असताना राज्य शासनाने रस्ते दुरुस्तीसाठी निधी दिला नाही. ...

The approval of the sand ghat auction will be rejected | रेती घाट लिलावांना मंजुरी नाकारणार

रेती घाट लिलावांना मंजुरी नाकारणार

गावातील रस्त्याची दुरवस्था : शासनाचे दुर्लक्ष, सरपंचाची माहिती
चुल्हाड (सिहोरा) : मागीलवर्षी रेतीघाटांना मंजुरी देण्यात आली असली तरी, मुदत संपली असताना राज्य शासनाने रस्ते दुरुस्तीसाठी निधी दिला नाही. त्यामुळे सिहोरा परिसरातील सरपंचानी नव्याने घाटांना मंजुरी नाकारणार असल्याचा इशारा जिल्हा प्रशासनाला दिला आहे. या आशयाचे निवेदन मुख्यमंत्री, महसुल मंत्री यांना पाठविले आहे.
या पत्रानुसार सिहोरा परिसरात वारपिंडकेपार आणि तामसवाडी नदीपात्रातील रेतीघाट लिलाव करण्यात आले आहे. यंदा अल्प पावसामुळे नदी पात्रातील रेती वर्षभर उपसा करण्यात आली आहे. ओव्हरलोड रेतीच्या वाहतुकीने गावातील प्रमुख रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. यामुळे रेती घाट लिलावाची मुदत संपली असता या खड्डेमय रस्त्यांनी ये-जा करतांना गावकऱ्यांना कसरत करावी लागत आहे. गावकरी आता रस्ते दुरुस्ती ओरड करीत आहे. रस्त्याची दुरावस्था ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना जबाबदार धरले जात आहे.
शासनाने वैनगंगा, बावनथडी नदी पात्रातील रेती घाट लिलावात काढले असताना, या लिलावातून कोट्यवधी रुपयांचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा झाला आहे. पंरतु या निधी अंतर्गत दुरावस्था झालेल्या रस्त्याची दुरुस्ती करण्याकरिता निधी उपलब्ध करण्यात आले नाही.
नदी काठावर वास्तव्य असल्याने अवाढव्य रेतीच्या उपसामुळे गावकऱ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. ट्रकचे आवागमन गावातून होत असल्याने वाढत्या प्रदुषनाने गावकरी आजाराच्या विळख्यात सापडत आहेत. दरम्यान रेती घाटाची सुर्योदय ते सुर्यास्त अशी मंजुरी देण्यात येत आहे. पंरतु कंत्राटदार हा नियम धाब्यावर बसवून रात्रभर रेतीचा उपसा करीत असल्यामुळे गावकऱ्यांची झोपच उडाली आहे.
दरम्यान रेती घाटांची मुदत संपली असून नव्याने रेती घाट लिलावात काढण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. यामुळे ग्राम पंचायतची मंजुरी घेतली जाणार असल्याने, गावकरी रेती घाटांच्या विरोधात रणशिंग फुकत आहेत. या परिसरात महालगाव, वारपिंडकेपार, सोंड्या बपेरा ही गावे बावनथडी नदी काठावर असून, सुकडी (नकुल) देवरी देव, पिपरी चुन्ही, तामसवाडी गावे वैनगंगा नदी काठावर आहेत. यामुळे यंदा रेती घाट लिलावांना ग्रामपंचायत अंतर्गत मंजुरी नाकारण्याचा इशारा सरपंचांनी दिला आहे. (वार्ताहर)

Web Title: The approval of the sand ghat auction will be rejected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.