पर्यटकांच्या सुविधांसाठी ५५ लाखांच्या निधीला मंजुरी
By Admin | Updated: July 19, 2016 00:36 IST2016-07-19T00:36:43+5:302016-07-19T00:36:43+5:30
कोका वन्यजीव व अभयारण्य भंडारा जिल्ह्याचे वैभव आहे. पर्यटन वाढीसाठी या अगोदर जिल्हा निधीतून ५६ लाखाच्या निधी दिला गेला.

पर्यटकांच्या सुविधांसाठी ५५ लाखांच्या निधीला मंजुरी
कोका वनविभाग गृहाचे लोकार्पण : नाना पटोले यांचे प्रतिपादन
करडी (पालोरा) : कोका वन्यजीव व अभयारण्य भंडारा जिल्ह्याचे वैभव आहे. पर्यटन वाढीसाठी या अगोदर जिल्हा निधीतून ५६ लाखाच्या निधी दिला गेला. यातून १०० वर्ष जुन्या व मोडकळीस आलेल्या वनविभागगृहाच्या कायापालट करण्यात आला. पुन्हा नव्याने बांबुच्या निर्मितीसाठी ५५ लाखाचा निधी जिल्हा निधीतून मंजूर करण्यात आला असून यातून अन्य सोयी सुविधांची निर्मिती केली जाईल. पर्यटन वाढीतून रोजगाराच्या सुविधा तयार होवून गावाचा विकास होण्यास मदत मिळणार असल्याचे प्रतिपादन खा. नाना पटोले यांनी केले.
कोका वनविश्रामगृहाच्या लोकार्पण कार्यक्रम प्रसंगी उद्घाटक स्थानावरून नागरिकांना माहिती देताना ते बोलत होते. उद्घाटकस्थानी खा. नाना पटोले होते. अतिथी म्हणून एन.आर. परविन, चोपकर, अरविंद जोशी, हरिराम मडावी, संजय मेश्राम, महेश पाठक, विजय मेहर, बारई, माकडे, डब्ल्यु. आर. खान, विपीन डोंगरे, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, वन व्यवस्थापन समिती अध्यक्ष वाल्मिक गोबाडे हजर होते.
पाणी अडवा, पाणी जिरवा, वन वाचेल तरच मनुष्य वाचेल. पर्यावरणाला वाचविणे काळाची गरज आहे. प्रत्येकाने झाडांवर प्रेम करायला शिकले पाहिजे, झाडांचे रोपन, संरक्षण व जतन केले पाहिजे, असे प्रतिपादन उपवनसंरक्षक एन.आर. परविन यांनी केले. बांधकामे, इमारत जिर्णाेद्धार, स्वयंपाक खोली, संडास, बांधकाम, बगीच्याची निर्मिती, वातानुकूलीत सोयी-सुविधा, स्वच्छता व देखरेख आदी कामांसाठी वनक्षेत्र सहायक डब्ल्यू.आर. खान, वनरक्षक विपीन डोंगरे यांचे कार्य मोलाचे ठरल्याची माहिती यावेळी मान्यवरांनी दिली. बांबु हरांच्या निर्मितीमुळे सोयी-सुविधांमध्ये भर पडेल, असेही यावेळी सांगण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन विजय मेहर यांनी केले. आभार वाल्मिक गोबाडे यांनी मानले. यशस्वितेसाठी वनकर्मचारी मारोती आगासे, केवळराम वलके, रूपचंद कुंभरे, संजय इळपाते, अंकुश मेश्राम, शंकर तिजारे व वनमजुरांनी मोलाचे सहकार्य केले. (वार्ताहर)