कोरोनामुळे निधन झालेल्या परिवारातील सदस्यांना अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:36 IST2021-05-10T04:36:03+5:302021-05-10T04:36:03+5:30
जवाहरनगर : आयुध निर्माणी, भंडारा येथे कर्तव्यावर असलेले कर्मचारी यांचे कोरोना प्रादुर्भावामुळे निधन झाले. त्यांचे परिवार रोजीरोटीपासून वंचित झाले. ...

कोरोनामुळे निधन झालेल्या परिवारातील सदस्यांना अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती द्या
जवाहरनगर : आयुध निर्माणी, भंडारा येथे कर्तव्यावर असलेले कर्मचारी यांचे कोरोना प्रादुर्भावामुळे निधन झाले. त्यांचे परिवार रोजीरोटीपासून वंचित झाले. परिणामी अनुकंपा तत्त्वावर त्यांच्या परिवारातील एका सदस्याला नोकरीवर सामावून घेण्यात यावे. तसेच पेन्शन तत्काळ सुरू करण्याची मागणी आयुध कर्मचारी संघ, आयुध निर्माणी, भंडारा यांनी महाप्रबंधकांना निवेदन दिले.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, वैश्विक महामारी कोरोना - १९ चे फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. या महामारीमुळे अनेकांचे प्राण घेतलेले आहे. कर्मचारी मोठ्या प्रमाणात बाधित झालेले आहे. विविध ठिकाणी औषधोपचार करूनसुद्धा त्यांचे प्राण वाचविता आले नाहीत. आतापर्यंत दहा आयुध निर्माणी कर्मचारी कोरोनामुळे निधन झाले; तर १५च्या वर कर्मचारी विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. परिणामी त्यांच्यावर निर्भर असलेली कुटुंबे दैनिक जीवन जगण्यापासून वंचित झाली आहेत.
त्यांच्या परिवारातील मुख्य कर्ती व्यक्ती निघून गेल्याने जीवन जगणे कठीण झाले आहे. या कठीण परिस्थितीवर मात करण्यासाठी विशेष बाब म्हणून, कर्मचाऱ्यांच्या परिवारातील एकाला अनुकंपा तत्त्वावर नोकरीत सामावून घेण्यात यावे व पारिवारिक पेन्शन शक्य तितक्या लवकर सुरू करण्यात यावी. जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावे. आशयाचे निवेदन आयुध कर्मचारी संघ, आयुध निर्माणी, भंडारा यांनी महाप्रबंधक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.