जुनी पेंशन योजना लागू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 00:58 IST2018-02-02T00:58:22+5:302018-02-02T00:58:36+5:30

पाच वर्षे समाजसेवा करणाऱ्या आमदार, खासदाराना महिन्याची ४० हजार रुपये पेंशन दिली जाते. पण वयाच्या ५८ वर्षापर्यंत विद्यार्थी घडविणाऱ्या शिक्षकांना मात्र जुनी पेंशन योजना बंद करण्यात आली आहे.

 Apply an Old Pension Scheme | जुनी पेंशन योजना लागू करा

जुनी पेंशन योजना लागू करा

ठळक मुद्देतुमसरात उपक्रम : शिक्षक परिषदेचे जिल्हा अधिवेशन

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : पाच वर्षे समाजसेवा करणाऱ्या आमदार, खासदाराना महिन्याची ४० हजार रुपये पेंशन दिली जाते. पण वयाच्या ५८ वर्षापर्यंत विद्यार्थी घडविणाऱ्या शिक्षकांना मात्र जुनी पेंशन योजना बंद करण्यात आली आहे. हा दुजाभाव आहे. राज्यातील शिक्षक कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन मिळालीच पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने केली आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे भंडारा जिल्हा अधिवेशन तुमसर येथील लोकमान्य टिळक राष्ट्रीय विद्यालयात २० व २१ जानेवारीला पार पडले. यावेळी उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी अध्यक्षस्थानी नागपूर विभाग अध्यक्ष के.के. वाजपेयी, आमदार नागो गाणार, जिल्हाध्यक्ष अशोक वैद्य, विभाग उपाध्यक्ष राधेश्याम पंचबुद्धे, अंगेश बेलहपाडे, सुभाष गोतमारे, भुजंगराज मेहरे, मनिषा काशिवार, दिशा गद्रे, जिल्हा उपाध्यक्ष के.डी. बोपचे, प्रदीप गोमासे, जिल्हाध्यक्ष गहूकार उपस्थित होते.
शिक्षकांनी संघटित राहून पेंशनच्या लढ्यात सहकार्य करावे असे आवाहन आमदार नागो गाणार यांनी केले. नवीन शिक्षण कायदा व संच मान्यता या विषयावर विभाग अध्यक्ष के.के. वाजपेयी व जिल्हाध्यक्ष अशोक वैद्य यांनी माहिती सांगितली. अंशदायी पेंशन योजनेवर आमदार नागो गाणार यांनी सविस्तर माहिती दिली. जिल्ह्यातील समस्याग्रस्त शिक्षकांच्या समस्या सोडविण्यात आल्या.
सेवानिवृत्त परिषदेचे कार्यकर्ते प्रदीप गोमासे, मिश्रा, आर.जी. निमजे व सरपंच विनोद तुमसरे यांचा सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक आर.एम. कडव, कार्यक्रमाचे संचलन सहकार्यवाह पी.एम. नाकाडे, आभार अशोक वैद्य यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सेवकराम चुटे, पांडूरंग टेंभरे, संजय गाढवे, निळकंठ कापगते, भट, पी.के. संग्रामे यांनी सहकार्य केले.

Web Title:  Apply an Old Pension Scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.