अल्पसंख्यक कल्याणाच्या योजना प्राधान्याने राबवा
By Admin | Updated: June 27, 2017 00:37 IST2017-06-27T00:37:02+5:302017-06-27T00:37:02+5:30
अल्पसंख्यक समाजातील युवक व विद्यार्थ्यांसाठी केंद्र तसेच राज्य शासनाच्या अनेक कल्याणकारी योजना आहेत. प्रधानमंत्री १५ कलमी कार्यक्रम ....

अल्पसंख्यक कल्याणाच्या योजना प्राधान्याने राबवा
श्याम तागडे : मुलींचे वसतीगृह या सत्रापासून सुरु करा, शिष्यवृत्तीसाठी ‘पोर्टल’वर नोंद आवश्यक
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : अल्पसंख्यक समाजातील युवक व विद्यार्थ्यांसाठी केंद्र तसेच राज्य शासनाच्या अनेक कल्याणकारी योजना आहेत. प्रधानमंत्री १५ कलमी कार्यक्रम हा अल्पसंख्यांकाच्या विकासाचा महत्वाचा कार्यक्रम आहे. अल्पसंख्यांक समाजाच्या आर्थिक व समाजिक उन्नतीसाठी असलेल्या विविध योजना जिल्हयात प्राधान्याने राबविण्यात याव्यात, असे निर्देश अल्पसंख्यांक विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे यांनी प्रशासनाला दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालय येथे आज अल्पसंख्यांक विकास आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.
जिल्हाधिकारी सुहास दिवसे, जिल्हा पोलीस अधिक्षक विनीता साहू, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश मेश्राम, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवी धकाते, कार्यकारी अभियंता अनिल येरकडे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर आडे व विविध विभागाचे अधिकारी बैठकीस उपस्थित होते.
शैक्षणिक सत्र सुरु होत असून केंद्र सरकारच्या प्रीमॅट्रीक शिष्यवृत्ती संदर्भात केंद्र सरकारच्या पोर्टलवर नोंद करणे आवश्यक असल्याचे तागडे यांनी सांगितले. या पोर्टलवर नव्याने शिष्यवृत्ती घेणा?्या विद्यार्थ्यांची तसेच यापूर्वी शिष्यवृत्ती घेणा?्या विद्यार्थ्यांची नोंदणी वेगवेगळी करणे आवश्यक आहे. जे विद्यार्थी शिष्यवृत्ती घेत आहेत. त्यांची नोंदणी रिनिव्हल या सदराखाली होईल याची काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी शिक्षण विभागास दिल्या.
मदरसा आधूनिकीकरणासाठी डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधूनिकीकरण योजना असून या योजनेत मदरसा पायाभूत सुविधा यासाठी २ लाख, वाचनालयासाठी ५० हजार तर इतर विषय शिकविण्यासाठी मानधनावर नियुक्ती अशी तरतूद आहे. या योजनेचा लाभ मदरस्यांना मिळवून दयावा, असेही ते म्हणाले. मदरस्यांची नोंदणी वक्फ बोर्ड औरंगाबाद यांच्याकडे करणे आवश्यक आहे. ज्या मदरस्यांची नोंदणी झाली नाही, अशा मदरस्यांची नोंदणी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. ज्या शाळेत ७० टक्केपेक्षा जास्त अल्पसंख्यांक आहेत. अशा शाळांना पायाभूत सुविधांसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. ही तरतूद पाच वषार्साठी असली तरी पायाभूत सुविधांसाठी त्यानंतरही निधी देण्यात येणार आहे. अशा शाळांचे सविस्तर प्रस्ताव अल्पसंख्यांक विभागाला त्वरित पाठविण्याच्या सूचना त्यांनी केल्या. ज्या शाळांना अनुदान मिळाले आहे त्या अनुदानाचा योग्य विनियोग झाला किंवा नाही याबाबतही अहवाल पाठवावा, असे ते म्हणाले. भंडारा येथे अल्पसंख्यांक समाजातील मुलींसाठी वसतीगृहाची इमारत तयार झाली असून ती या शैक्षणिक स्तरापासून सुरु करावी, अशा सूचना केली.
अल्पसंख्यांक समाजाच्या शिक्षणाच्या संधी वाढविणे, एकात्मिक बालविकास सेवांची पुरेशी उपलबधता, उर्दू शिक्षणासाठी अधिक संसाधन, मदरसा शिक्षणाचे आधूनिकीकरण, अल्पसंख्यांक समुदायातील गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, मौलाना आझाद शिक्षण प्रतिष्ठानच्या माध्यमातून शैक्षणिक संरचनेत सुधारणा करणे, गरिबांसाठी स्वयंरोजगार आणि मजूरी योजना, रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम, अल्पसंख्यांक झोपडपट्टयांमध्ये सुधारणा, आर्थिक कायार्साठी कर्ज सहाय्य, प्रमोद महाजन कौशल्य विकास व उद्योजकता विकास कार्यक्रम, राज्य आणि केंद्रीय सेवांमध्ये भरती, पोलीस भरती प्रशिक्षण, ग्रामीण गृह योजनेत समान वाटा तसेच अल्पसंख्यांक बहुल ग्रामीण क्षेत्र विकास कार्यक्रम आदि महत्वाच्या योजना अल्पसंख्यांकांसाठी आहेत. या सर्व योजनांचा लाभ अल्पसंख्यांक समुदायातील लाभार्थ्यांना देण्यात यावा, असे त्यांनी सांगितले. मुलींच्या वसतीगृह इमारतीला तागडे यांनी भेट देऊन पाहणी केली.