सुशिक्षित बेरोजगारांना भत्ता लागू करा
By Admin | Updated: December 14, 2015 00:43 IST2015-12-14T00:43:04+5:302015-12-14T00:43:04+5:30
शासनाचे उदासीन धोरणामुळे जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांचा हाताला काम नाही. त्यामुळे शासनाने सुशिक्षित बेरोजगारांना बेरोजगारी भत्ता लागू करावा,

सुशिक्षित बेरोजगारांना भत्ता लागू करा
जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन : तरुण बेरोजगार समितीची मागणी
भंडारा : शासनाचे उदासीन धोरणामुळे जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांचा हाताला काम नाही. त्यामुळे शासनाने सुशिक्षित बेरोजगारांना बेरोजगारी भत्ता लागू करावा, अशी मागणी तरुण बेरोजगार कृती समितीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
वाढत्या शहरीकरणामुळे ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांची संख्या वाढत चालली आहे. जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्र नसल्यामुळे रोजगार निर्मितीची आशा धूसर झाली आहे. यात स्थानिक नेत्यांची दुर्लक्षित धोरण कारणीभूत आहे. जे उद्योग व्यवसाय आहे. तिथे स्थानिकांना डावलून बाहेरुन व्यक्तींना रोजगार देण्यात येत आहे. त्यामुळे बेरोजगारांवर पुन्हा बेरोजगारीचे संकट वाढले आहे. त्यामुळे शासनाने सुशिक्षित बेरोजगार तरुणांना बेरोजगारी भत्ता देण्यात यावा अश्या आशयाचे निवेदन देण्यात आले आहे. शिष्टमंडळात अमित मेश्राम, कुणाल भाजीपाले, राज रोंघे, प्रवीण कांबळे, गणेश बिल्लोरे, धमेंद्र रहांगडाले, रुपेश राऊत, महेंद्र पुंडे, सागर उकरे, अशोक कडव आदींचा समावेश होता. (शहर प्रतिनिधी)