मतदारांनी छायाचित्र जमा करण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:33 IST2021-03-25T04:33:21+5:302021-03-25T04:33:21+5:30

छायाचित्र नसलेल्या मतदारांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली असून, १४९६ मतदारांचे छायाचित्र नसल्याचे स्पष्ट झाले आहे. शंभर टक्के छायाचित्र असलेली ...

Appeal to voters to submit photographs | मतदारांनी छायाचित्र जमा करण्याचे आवाहन

मतदारांनी छायाचित्र जमा करण्याचे आवाहन

छायाचित्र नसलेल्या मतदारांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली असून, १४९६ मतदारांचे छायाचित्र नसल्याचे स्पष्ट झाले आहे. शंभर टक्के छायाचित्र असलेली व त्रुटीरहित मतदार यादी तयार करण्यात येणार आहे. छायाचित्र नसलेल्या मतदारांची यादी संबंधित मतदान केंद्र, नगर परिषद कार्यालय, तलाठी कार्यालय, मंडळ अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय येथे अवलोकनार्थ ठेवण्यात आली आहे. तसेच तुमसर तालुक्यातील सर्व राजकीय पक्षांची सभा तहसील कार्यालयात घेण्यात आली. या सभेला शंकर राऊत, देवचंद ठाकरे, किशोर गजभिये, शेखर कोतपत्नीवार, कैलाश पडोळे, योगेश सिंगनजुळे, मुन्ना पुंडे, नितीन सेलोकर आदी उपस्थित होते. सर्व मतदारांनी आपला मतदार यादीतील तपशील तपासून घ्यावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी नितीन सदगीर यांनी केले आहे.

Web Title: Appeal to voters to submit photographs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.