प्राथमिक शिक्षक संघाचे प्रधान सचिवांना निवेदन

By Admin | Updated: November 11, 2015 00:29 IST2015-11-11T00:29:45+5:302015-11-11T00:29:45+5:30

शिक्षण विभागाच्यावतीने आयोजित कार्यक्रमासाठी शालेय शिक्षण व क्रिडा विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार भंडारा येथे मंगळवारला आले होते.

Appeal to Principal Secretary of Primary Teachers Association | प्राथमिक शिक्षक संघाचे प्रधान सचिवांना निवेदन

प्राथमिक शिक्षक संघाचे प्रधान सचिवांना निवेदन

भंडारा : शिक्षण विभागाच्यावतीने आयोजित कार्यक्रमासाठी शालेय शिक्षण व क्रिडा विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार भंडारा येथे मंगळवारला आले होते. त्यावेळी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या जिल्हाध्यक्ष रमेश सिंगनजुडे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.
यावेळी त्यांना दिलेल्या निवेदनात शालेय पोषण आहाराचे काम मुख्याध्यापकांकडून काढून स्वतंत्र यंत्रणेकडे सोपविण्याय यावे, शालार्थ आणि सरल अशा संगणकीय कार्यासाठी केंद्रस्तरावर स्वतंत्र व्यक्ती व संगणकाची व्यवस्था करण्यात यावी, डिजीटल क्लास रुम असलेल्या शाळांमध्ये संगणक देखभाल दुरूस्ती व विद्युत बिलांसाठी प्रत्येक शाळेला स्वतंत्र तरतुद करण्यात यावी, शिक्षण विभागातील रिक्त पदांच्या पूर्तीसाठी पदोन्नतीच्या कालबद्ध कार्यक्रम तातडीने आखण्यात यावा, राज्यातील सर्वच जिल्ह्यात शाळेच्या कामाच्या दिवसाच्या बाबतीत एकसुत्रता असावी या मागण्यांचा समावेश होता.
यावेळी शिष्टमंडळात प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रमेश सिंगनजुडे, जिल्हा सरचिटणीस शीलकुमार वैद्य, केशव बुरडे, अशोक ठाकरे, शंकर नखाते, नेपाल तुरकर, रामेश्वर कांबळे, नरेश कोल्हे, मुलचंद वाघाये, यशपाल बगमारे, रमेश काटेखाये, डी.डी. दमाहे, अरुण बघेले, वनवास धनिस्कार, किशोर ईश्वरकर, कोमल चव्हाण, देवराव थाटे, जे.एम.पटोले, रामकुष्ण बडवाईक, दिलीप ब्राम्हणकर, एन.टी. गायधने, रवि नखाते, विनायक कोसरे, प्रमोद डाकरे, शंकर बोंद्रे, सुरेश कोरे, किशोर कुर्वे, विलास दिघोरे, योगेश पुडके, मुकेश मेश्राम, हिरामण वाघाये, भास्कर अलोणे, तुळशीराम पटले, केशव अतकरी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Appeal to Principal Secretary of Primary Teachers Association

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.