विद्यार्थ्यांची नागझिरा व्याघ्र प्रकल्पात निसर्गभ्रमंती
By Admin | Updated: February 27, 2016 00:53 IST2016-02-27T00:53:54+5:302016-02-27T00:53:54+5:30
येथील कृष्णमुरारी कटकवार हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयांतर्गत राष्ट्रीय हरित सेना जयंत कटकवार ग्लोबल नेचर क्लब व बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी नागपूर ...

विद्यार्थ्यांची नागझिरा व्याघ्र प्रकल्पात निसर्गभ्रमंती
मार्गदर्शन : हरित सेना तथा ग्लोबल नेचर क्लबचा संयुक्त उपक्रम
साकोली : येथील कृष्णमुरारी कटकवार हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयांतर्गत राष्ट्रीय हरित सेना जयंत कटकवार ग्लोबल नेचर क्लब व बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी नागपूर टायगर सेल मार्फत नेचर क्लब सदस्यांकरिता नागझिरा व्याघ्र प्रकल्पात निसर्गभ्रमंती करण्यात आली.
गटसमन्वयक सौरभ दंदे व ग्लोबल नेचर क्लबचे संघटक प्रा. अशोक गायधने तसेच प्रा.के.पी. बिसेन तसेच गटसमन्वयक सौरभ दंदे आणि मार्गदर्शक राधेश्याम उईके यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण परिस्थितीकी, अधिवास व त्यांचे संरक्षण यावर माहिती दिली. निसर्गभ्रमंतीमध्ये युवराज बोबडे, गौरव उके, अंकित शहारे, शैलेश गोबाडे, पलाश जगिया, हर्षल राखडे, शाहिद पठाण, दिवांशु पोवळे, शुभम शहारे, सुमित तिडके, रजत रोकडे, कौशिक परमार, आंचल केंद्रवार, दीपा देशमुख, श्रुती हुकरे, आकांशा टेंभुर्णे, प्राजक्ता लांजेवार, अवंती बोरकर, प्रज्ञा मडामे, जान्हवी दखणे, निकिता रामटेके, लक्ष्मी चोपकर या नेचर क्लब सदस्य व राष्ट्रीय हरित सेनेच्या सदस्यांनी सहभाग नोंदविला. उपक्रमासाठी प्राचार्य प्रकाश मस्के, मनीषा काशिवार, पुष्पा बोरकर, संजय पारधी, विनोद तिडके, जागेश्वर तिडके, बी.एस. लंजे, सेवक कापगते, विठ्ठल सुकारे, अनुराधा रणदिवे, गेडाम, कमलेश टोपले, बाळकृष्ण मेश्राम, डी.बी. उईके, बी.एन. मांदाडे यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)