भंडारा अर्बन बँकेच्या पुन्हा एका संचालकाचा राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2023 19:39 IST2023-04-13T19:39:28+5:302023-04-13T19:39:47+5:30

राजीनामे देणाऱ्या संचालकांची संख्या सहावर

Another director of Bhandara Urban Bank resigns | भंडारा अर्बन बँकेच्या पुन्हा एका संचालकाचा राजीनामा

भंडारा अर्बन बँकेच्या पुन्हा एका संचालकाचा राजीनामा

गोपालकृष्ण मांडवकर 

भंडारा : भंडारा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या पाच संचालकांनी आज गुरुवारी दुपारी अध्यक्ष नाना पंचबुद्धे यांच्याकडे राजीनामा सोपवून चार तास उलटत नाही, तोच पुन्हा एका संचालकानेही राजीनामा दिला आहे. उदय मोगलेवार असे त्यांचे नाव आहे. त्यामुळे आज राजीनामा दिलेल्या संचालकांची संख्या सहावर गेली आहे.

उदय मोगलेवार यांनी आज नागपुरात सहकारी संस्थांच्या सहनिबंधकांकडे आपल्या पदाचा राजीनामा सोपविला. प्रक्रियेनुसार संचालकांना राजीनामा अध्यक्षांकडे द्यावा लागतो. आपला राजीनामा ते अध्यक्षांकडे मेलद्वारे पाठविणार असल्याची माहिती आहे.

आजच्या घडामोडीमुळे आता राजीनामा दिलेल्या संचालकांची संख्या सहा व यापूर्वी दोन असे मिळून आठ झाली आहे. तर अपात्र ठरवलेल्या संचालकांची संख्या चार अशी आहे. यामुळे ही बँक अल्पमतात आली असून बँकेवर प्रशासक नेमला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Web Title: Another director of Bhandara Urban Bank resigns