भंडारा जिल्हा कोरडा दुष्काळ घोषित करा
By Admin | Updated: September 21, 2016 00:37 IST2016-09-21T00:37:32+5:302016-09-21T00:37:32+5:30
शेतकऱ्यांचे पीक कर्ज पुनर्रगठन करून भंडारा जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करण्यात यावे...

भंडारा जिल्हा कोरडा दुष्काळ घोषित करा
मुख्यमंत्र्यांना निवेदन : नरेश करंजेकर यांची मागणी
साकोली : शेतकऱ्यांचे पीक कर्ज पुनर्रगठन करून भंडारा जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करण्यात यावे असे निवेदन साकोली शिवसेना तालुका प्रमुख नरेश करंजेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे.
या निवेदनानुसार शेतकऱ्यांचे पीक कर्ज पुनर्रगठन करण्याबाबद शासनाने मार्च महिन्यात घोषणा केली होती. विदर्भापैकी भात शेती पिकविणारे भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यातील ९९ टक्के शेतकरी शेतमजूर हे शेतीवर अवलंबून आहेत.
ज्या जिल्ह्याची आणेवारी ५० टक्यापेक्षा कमी आहे, अशा जिल्ह्याचे पुनर्रगठन पीक कर्जाचे आदेश दिलेले होते पण आम्ही स्वत: या पाचही जिल्ह्याचे पुनर्रगठन हे फक्त २०१४-१५ या वर्षाचा करण्यात आहे.
त्यामुळे या पाचही जिल्ह्याचा २०१०-११ पासून २०१६ पर्यंत थकीत असलेले संपूर्ण पीक कर्ज पुनर्रगठीत करून शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून जिल्हा कोरडा दुष्काळ घोषित करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. (तालुका प्रतिनिधी)