पशु वैद्यकीय चिकित्सालय वाऱ्यावर

By Admin | Updated: May 17, 2016 00:23 IST2016-05-17T00:23:21+5:302016-05-17T00:23:21+5:30

शेतीसोबत दुग्ध व्यवसायासाठी पशुपालनाची जोड धरणाऱ्या शेतकऱ्यांवर तालुका लघु पशु वैधकीय सर्व चिकीत्सालय वाऱ्यावर असल्याने वेळेवर उपचार होत नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.

Animal medical hospital wind | पशु वैद्यकीय चिकित्सालय वाऱ्यावर

पशु वैद्यकीय चिकित्सालय वाऱ्यावर

उपचार होत नसल्याची शेतकऱ्यांची ओरड : कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेल्या इमारतीचा वाली कोण ?
लाखांदूर : शेतीसोबत दुग्ध व्यवसायासाठी पशुपालनाची जोड धरणाऱ्या शेतकऱ्यांवर तालुका लघु पशु वैधकीय सर्व चिकीत्सालय वाऱ्यावर असल्याने वेळेवर उपचार होत नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.
तालुक्यात शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. सिंचनाची साधने असताना एकरी उत्पादनात दरवर्षी घट येत असल्याने आला याभागातील शेतकऱ्याचा कल पशुपालनाकडे जास्त वळला. दुग्धव्यवसाय आता या भात शेतकऱ्याचा मुख्य व्यवसाय झाला.
यासाठी तालुक्याच्या मुख्य ठेकाणी कोट्यवधीचा निधी खर्च करुन तालुका लघु पशु वैधकीय सर्व चिकीत्सालयाची भव्य ईमारत बांधण्यात आली. मागिल काही दिवसात जिल्ह्याचे पालक मंत्री डां दिपक सावत व साकोलीचे आमदार राजेश कापगते यांचे हस्ते लोकार्पण सोहळा पार पडला. सदर दवाखाण्यात एकूण चार पदे मंजूर असताना फक्त सहायक आयुक्त व पट्टी बंधक अशी दोन पदे भरण्यात आली. त्यापैकी पशु विकास अधिकारी व परिचर ही दोन पदे अध्याप भरण्यात आली नाही. केवळ दोनच पदे भरण्यात आल्याने दवाखाना बंद व उघडण्याची वेळ शेतकऱ्यांना माहीत नाही. त्यामुळे सकाळपासून ते सायंकाळपर्यंत शेतकरी पशुवर उपचार करण्यासाठी टाटकळत असतो.
डॉक्टर बाहेरगावाला कामासाठी गेले असता दवाखाना बंद ठेवळ्याची पाळी पट्टीबंधकावर येते. मागील अनेक दिवसापासून डॉक्टर सुट्टीवर असल्याने पशुधनावर उपचार होत नसल्याने पशुधन धोक्यात आले आहे. दवाखाण्यातील महागडे साहित्य, उपकरणे व कोट्यवधींची इमारत धूळ खात पडली आहे. तत्काळ सर्व दवाखान्यातील मंजूर पदे भरण्याचे मागणी पशुधन पालकांनी केली आहे. (तालुका प्रतिनीधी)

Web Title: Animal medical hospital wind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.