पशुसंवर्धन, शेतीपूरक व्यवसाय
By Admin | Updated: February 23, 2017 00:26 IST2017-02-23T00:26:13+5:302017-02-23T00:26:13+5:30
शेतकऱ्यांनी जोडधंदा म्हणून पशूधन पाळणे ही काळाची गरज आहे. आर्थिक विकास व प्रगती होण्यास पशुधन आवश्यक आहे.

पशुसंवर्धन, शेतीपूरक व्यवसाय
चरण वाघमारे : ५५ हजार २५० रुपयांचे बक्षिसांचे वाटप
तुमसर : शेतकऱ्यांनी जोडधंदा म्हणून पशूधन पाळणे ही काळाची गरज आहे. आर्थिक विकास व प्रगती होण्यास पशुधन आवश्यक आहे. आर्थिक सुबत्तेचे पशूधन हे प्रतीक आहे असे प्रतिपादन आमदार चरण वाघमारे यांनी व्यक्त केले.
तुमसर येथे आयोजित पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती, तुमसर जिल्हा परिषद भंडारा अंतर्गत पशुप्रदर्शनी व गोपालकांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
प्रमुख अतिथी म्हणून जि.प. पशुसंवर्धन सभापती नरेश डहारे, महिला व बालकल्याण सभापती शुभांगी राहांगडाले, नगराध्यक्ष प्रदीप पडोळे, कृउबा सभापती भाऊराव तुमसरे, जिल्हा पशुसंवर्धन आयुक्त डॉ.किशोर कुंभरे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.राजू शहारे, पं.स. सभापती कविता बनकर, उपसभापती शेखर कोतपल्लीवार उपस्थित होते. पशूप्रदर्शनीत निवडक जनावरांना गटाप्रमाणे रोख बक्षिस ५५२५० वाटप करण्यात आले. शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय तथा पशुसंवर्धन विषयक कार्य करणाऱ्या निवडक गोपालकांचा यावेळी सत्कार करण्यात आले. मुक्त गोठा पद्धत तथा पशूधन जोपासणे, त्याची काळजी घेण्याची यशस्वी पद्धत राबविल्याबद्दल तालुका पशुसंवर्धन अधिकारी तथा पशू प्रदर्शनीचे आयोजक डॉ.भाष्कर चोपकर यांच्या अतिथींनी सत्कार केला.
गोपालकांकरिता कलापथक, प्रबोधन कार्यक्रम घेण्यात आले. पशुप्रदर्शनी व गोपालक मेळाव्याला जि.प. सदस्य संदीप टाले, संगीता सोनवाने, प्रेरणा तुरकर, गीताताई माटे, धनेंद्र तुरकर, रेखा ठाकरे, के.के. पंचबुद्धे, प्रतीक्षा कटरे, पं.स. सदस्य जितेंद्र सर्याम, राजेंद्र ढबाले, शिशुपाल गौपाले, बाळकृष्ण गाढवे, सुप्रिया राहांगडाले, अरविंद राऊत, रिना गौपाले, गुरुदेव भोंडे, हिरालाल नागपुरे, मुन्ना पुंडे, रोषणा नारनवरे, मंगला कनपटे, विमल कानतोडे, संगीता मरसकोल्हे, साधना चौधरी, रेखा धुर्वे, डॉ.विवेक इटनकर, सह कर्मचारी, पशुपालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)