अप्पर पोलीस अधीक्षकपदी अनिकेत भारती रुजू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 23:09 IST2019-07-18T23:09:24+5:302019-07-18T23:09:37+5:30
पोलीस विभागात झालेल्या बदल्यानुसार भंडारा जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षकपदी अनिकेत भारती रुजू झाले. अप्पर पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर यांच्याकडून त्यांनी कार्यभार स्विकारला.

अप्पर पोलीस अधीक्षकपदी अनिकेत भारती रुजू
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : पोलीस विभागात झालेल्या बदल्यानुसार भंडारा जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षकपदी अनिकेत भारती रुजू झाले. अप्पर पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर यांच्याकडून त्यांनी कार्यभार स्विकारला. भंडारा येथील अप्पर पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर यांची नागपूर येथे लाचलुचपत विभाग येथे बदली झाली आहे. अनिकेत भारती हे यापुर्वी पुणे येथील महामार्ग सुरक्षा विभागात पोलीस उपअधीक्षक म्हणून कार्यरत होते. पदभारप्रसंगी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.