संतप्त विदर्भवाद्यांनी राज ठाकरेंचा पुतळा जाळला

By Admin | Updated: September 15, 2016 00:30 IST2016-09-15T00:30:57+5:302016-09-15T00:30:57+5:30

मुंबईत विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या पत्रपरिषदेत राडा करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या निषेधार्थ...

The angry Vidarbhaan burnt the statue of Raj Thackeray | संतप्त विदर्भवाद्यांनी राज ठाकरेंचा पुतळा जाळला

संतप्त विदर्भवाद्यांनी राज ठाकरेंचा पुतळा जाळला

विदर्भ राज्य आंदोलन समिती : अखंड महाराष्ट्राच्या विधानसभेचा विरोध करू
भंडारा : मुंबईत विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या पत्रपरिषदेत राडा करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या निषेधार्थ संतप्त विदर्भवादी संघटनांनी बुधवारला दुपारी साई मंगल कार्यालयासमोर मनसेप्रमुख राज ठाकरे यांचा पुतळा जाळला.
यावेळी आयोजित पत्रपरिषदेत विदर्भ राज्य आंदोलन समितीचे निमंत्रक राम नेवले म्हणाले, ३-४ आॅक्टोबरला नागपूर येथे विदर्भ राज्याची विधानसभा भरविण्यात येत आहे. या विधानसभेमध्ये विदर्भाचे अर्थसंकल्प मांडून विदर्भ राज्य कसे फायद्याचे आहे हे मांडण्यात येणार आहे. विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कुपोषण, नक्षलवाद कसे संपवू शकते यासह विदर्भातील कृषी पंपाचे लोडशेडींग संपवून निम्म्या दरामध्ये वीज देऊ शकतो हा निर्णय या विधानसभेमध्ये होणार आहे.
विदर्भातील मतदार संघातून ६२ आमदार, त्यातून मंत्री, मुख्यमंत्री तसेच राज्यपालाची निवड करण्यात येणार असून विदर्भातून विदर्भवादी कार्यकर्ते, युवक, महिला या विधानसभेसाठी उपस्थित राहणार आहे. अखंड महाराष्ट्राची विधानसभा नागपुरच्या विधानभवनात भरणार आहे. त्या विधानभवनावर विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने पहिल्याच दिवशी ५ डिसेंबर रोजी मोर्चा काढून विधान भवनासमोर ठिय्या आंदोलन करून अखंड महाराष्ट्राच्या विधानसभेला विरोध करण्यात येणार आहे. ‘अखंड महाराष्ट्रवाद्यांनो विदर्भ सोडा’, ‘सत्ताधाऱ्यांनो विदर्भ देता की जाता’ हे घोषवाक्य या आंदोलनात राहणार असून ‘विदर्भ मिळवू औंदा’ याचवर्षी विदर्भ द्या, यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.
या आंदोलनासाठी जनजागृती करण्यासाठी विदर्भातील ५ सिमेवरून ५ विदर्भ दिंडी यात्रा निघणार असून या सर्व दिंड्या ५ डिसेंबरला नागपूरला पोहचतील. विदर्भ राज्य देऊ, असे दिलेले आश्वासन पूर्ण करू या नावावर महाराष्ट्राच्या निवडणुका लढल्या. त्यामुळे आम्ही ४४ आमदार विदर्भातून निवडून दिले म्हणून तुमची महाराष्ट्रात सत्ता आली. वैदर्भीय जनतेची तुम्ही फसवणूक केली, असा आरोपही विदर्भ राज्य आंदोलन समितीने केला. यावेळी माजी राज्यमंत्री डॉ.रमेश गजबे, माजी आमदार अ‍ॅड.आनंदराव वंजारी, माजी आमदार मधुकर कुकडे, अ‍ॅड. नंदा पराते, अर्जुन सुर्यवंशी वासुदेव नेवारे, प्रभाकर सपाटे, दामोधर क्षीरसागर, अ‍ॅड.शशीर वंजारी, मंजुषा बुराडे, गायत्री पंचबुद्धे, अनिता बोरकर, तुषार हट्टेवार, सारंग तिडके, प्रमोद मानापुरे उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: The angry Vidarbhaan burnt the statue of Raj Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.