शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
3
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
4
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
5
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
6
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
7
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
8
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
9
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
10
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
11
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
12
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
13
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
14
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
15
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
16
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
17
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
18
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
19
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
20
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे

महामार्ग दुरुस्तीसाठी संतप्त खासदार उतरले रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2021 5:00 AM

राज्यमार्ग असलेला भंडारा-तुमसर हा मार्ग आता राष्ट्रीय महामार्ग म्हणून ओळखला जाणार आहे. राष्ट्रीय महामार्ग परिवर्तित झाल्यानंतर या मार्गाचे रुंदीकरण आणि नव्याने बांधकाम केले जाणार आहे. मात्र सद्यस्थितीत या मार्गाची भंडारा शहरात झालेली अवस्था अत्यंत वाईट आहे. शास्त्री चौक ते टाकळीपर्यंत  पायी चालणेही कठीण झाले असताना वाहन चालविणे जीवघेणे ठरत आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शहरातून जाणाऱ्या व राष्ट्रीय महामार्ग परिवर्तित झालेल्या भंडारा-तुमसर मार्गाची शहरातून झालेली दुरवस्था पाहता त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी, या मागणीसाठी खासदार सुनील मेंढे यांच्या नेतृत्वात रविवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. जीवघेणा ठरत असलेला रस्ता तात्काळ दुरुस्त केला जात नाही, तोपर्यंत माघार न घेण्याच्या भूमिकेवर ठाम असलेल्या खासदारांना सोमवारपासून काम सुरू करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. सोमवारपासून काम सुरू न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही खासदार मेंढे यांनी दिला आहे.राज्यमार्ग असलेला भंडारा-तुमसर हा मार्ग आता राष्ट्रीय महामार्ग म्हणून ओळखला जाणार आहे. राष्ट्रीय महामार्ग परिवर्तित झाल्यानंतर या मार्गाचे रुंदीकरण आणि नव्याने बांधकाम केले जाणार आहे. मात्र सद्यस्थितीत या मार्गाची भंडारा शहरात झालेली अवस्था अत्यंत वाईट आहे. शास्त्री चौक ते टाकळीपर्यंत  पायी चालणेही कठीण झाले असताना वाहन चालविणे जीवघेणे ठरत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग राज्य अधिनस्त सद्यस्थितीत असलेल्या या मार्गाची डागडुजी करण्यासंदर्भात अनेकदा मागणी केली गेली. प्रशासनाच्या वेळकाढूपणाला कंटाळून खासदार सुनील मेंढे यांनी पुढे येत रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला.  आंदोलनाला आपला पाठिंबा आहे अशा शब्दात नाना पंचबुद्धे यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी रुबी चद्दा, आशु गोंडाने,  हेमंत महाकाळकर, कैलास तांडेकर, रजनीश मिश्रा, नगरसेविका चंद्रकला भोपे, साधना त्रिवेदी, शमीमा शेख, वनिता कुथे, गीता सिडाम, मधुरा मदनकर, भुमेश्वरी बोरकर, आशा  उईके, संतोष त्रिवेदी, सूर्यकांत इलमे, मनोज बोरकर, रोशन काटेखाये, रोशनी पडोळे, माला बागमारे, पप्पू भोपे, अजीज शेख, यश ठाकरे, शैलेश मेश्राम, शिव आजबले, नागरिक उपस्थित होते.

विषय राजकारणापलीकडील- रविवारी दुपारी खासदार मेंढे यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते व नागरिक शास्त्री चौक परिसरात रस्त्यावर उतरून वाहतूक अडवून धरली. यावेळी माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे, भाकपचे हिवराज उके हे सुध्दा सहभागी झाले होते. विषय लोकांच्या जीवाशी खेळणारा असल्याने राजकारणापलीकडे असल्याचे या नेत्यांनी स्पष्ट केले. जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत येथून न हलण्याची भूमिका सर्वांनी घेतली. अर्धा तास वाहतूक अडवून धरल्यानंतर बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता तेथे आले. चर्चेदरम्यान डागडुजीचे काम सुरू करण्याची मागणी खासदारांनी केली. यात  होईल. सोमवारपासून काम सुरू करण्याचा शब्द कार्यकारी अभियंत्यांनी दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. 

 

टॅग्स :Member of parliamentखासदारpwdसार्वजनिक बांधकाम विभाग