अंगणवाडी कर्मचाऱ्यांची दिवाळी गेली अंधारात

By Admin | Updated: November 13, 2015 00:41 IST2015-11-13T00:41:34+5:302015-11-13T00:41:34+5:30

राज्य शासनाच्या एकात्मिक बाल व महिला विकास प्रकल्पांतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका आणि मदतनिस महिलांना गेल्या सहा महिन्यांपासून मानधन मिळाले नाही.

Anganwadi workers die Diwali in dark | अंगणवाडी कर्मचाऱ्यांची दिवाळी गेली अंधारात

अंगणवाडी कर्मचाऱ्यांची दिवाळी गेली अंधारात

आंदोलनाचा पवित्रा : सहा महिन्यांचे मानधन रखडले
रविंद्र चन्नेकर बारव्हा
राज्य शासनाच्या एकात्मिक बाल व महिला विकास प्रकल्पांतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका आणि मदतनिस महिलांना गेल्या सहा महिन्यांपासून मानधन मिळाले नाही. परिणामी त्यांची यावर्षीची दिवाळी मानधनाविना अंधारात गेली आहे.
भंडारा जिल्ह्यात जवळपास १५०० अंगणवाडी सेविका व मदतनिस कार्यरत आहेत. त्यांचे सहा महिन्यापासून मानधन मिळाले नाही. दरवर्षी दिवाळीनिमित्त मिळणारी भाऊबिज भेटही वाटप झाली नाही. यामुळे दिवाळीचा आनंद त्यांच्या नशिबी दिसून येत नाही.
थकीत मानधन त्वरीत मिळावे याकरिता अंगणवाडी सेविका आणि मदतनिस महिलांच्या संघटनांनी वेळोवेळी आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले. मात्र आंधळ्या आणि बहिऱ्या प्रशासनाला त्यांची किव आली नाही. एकीकडे शासन शासकीय कर्मचाऱ्यांना भरीव वेतन वाढ देत आहे. मात्र अंगणवाडी कर्मचाऱ्यांना तुटपुंजे मानधन देऊन त्यांना अनेक विविध कामाचा बोझा थोपविला जात आहे. तुटपुंजे मानधनही वेळेवर मिळत नसल्याने त्यांना विविध आर्थिक सगळ्यांना तोंड द्यावे लागते. मागण्या पूर्ण करण्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी अनेकदा मोर्चे, आंदोलने केले. मात्र प्रशासनाकडून आश्वासनाची खैरात देऊन त्यांची बोळवण केली जात आहे. अंगणवाडी सेविका व मदतनिसांना सहा महिन्यांचे मानधन तर मिळाले नाही. मात्र शासनाकडून दरवर्षी दिवाळी भेट म्हणून रोख रक्कम दिली जाते. ती सुद्धा त्यांना मिळाली नाही. शासकीय निधी उपलब्ध करून देण्यात विलंब होत असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
शासकीय कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना वाढीव वेतनासह बोनसही वेळेपूर्वी दिला जातो. ऐन दिवाळीच्या काळात त्यांच्या मानधनाची समस्या निकाली काढली नसल्याने जिल्ह्यातील सेविकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

Web Title: Anganwadi workers die Diwali in dark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.