लाखांदूरमध्ये अंगणवाडीतार्इंचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 22:51 IST2018-09-26T22:51:19+5:302018-09-26T22:51:35+5:30
२५ पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या अंगणवाडी केंद्र बंद करण्याच्या शासननिर्णयाविरोधात लाखांदूर तालुक्यातील अंगणवाडी तार्इंनी येथील प्रकल्प अधिकारी कार्यालयावर मोर्चा नेला. आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले.

लाखांदूरमध्ये अंगणवाडीतार्इंचा मोर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर : २५ पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या अंगणवाडी केंद्र बंद करण्याच्या शासननिर्णयाविरोधात लाखांदूर तालुक्यातील अंगणवाडी तार्इंनी येथील प्रकल्प अधिकारी कार्यालयावर मोर्चा नेला. आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले.
अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने संघटनेचे कार्याध्यक्ष किसनाबाई भानारकर यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. येथील गांधी चौकातून मोर्चाला प्रारंभ झाला. विविध घोषणा देत हा मोर्चा प्रकल्प अधिकारी कार्यालयावर पोहचला. त्याठिकाणी निवेदन देण्यात आले. त्यात २५ पेक्षा कमी पटसंख्या असलेली अंगणवाडी केंद्र बंद करू नये, प्रवास भत्ता, भोजन भत्ता नियमित देण्यात यावा, वर्षभरात किमान १५ दिवसांची वैद्यकीय रजा देण्यात यावी, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर वेतन देण्यात यावे या व इतर मागण्यांचा समावेश होता. या मोर्चात लाखांदूर तालुक्यातील शेकडो अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या होत्या.