अन् रेतीचा टिप्पर शिरला बारमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 22:00 IST2019-03-12T22:00:41+5:302019-03-12T22:00:55+5:30

रेतीची वाहतूक करणारा भरधाव टिप्पर वीज खांबाला धडक देत बारमध्ये शिरल्याची घटना पवनी येथे सोमवारी रात्री ९.३० वाजता घडली. या अपघातात दोन जण जखमी झाले.

And the sandy tip of the bar is in the bar | अन् रेतीचा टिप्पर शिरला बारमध्ये

अन् रेतीचा टिप्पर शिरला बारमध्ये

ठळक मुद्देपवनीची घटना : अवैध वाहतुकीचा प्रताप

लोकमत न्यूज नेटवर्क
पवनी : रेतीची वाहतूक करणारा भरधाव टिप्पर वीज खांबाला धडक देत बारमध्ये शिरल्याची घटना पवनी येथे सोमवारी रात्री ९.३० वाजता घडली. या अपघातात दोन जण जखमी झाले.
वैनगंगा नदीवर रेतीचे मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरु आहे. रात्री टिप्पर क्रमांक एमएच ४० बीजी ६६९० रेती घेऊन जात होता. पवनी नागपूर मार्गावर स्वाती बार समोर टिप्पर अनियंत्रीत झाला. एका वीज खांबाला धडक देऊन टिप्पर थेट बारमध्ये शिरला.
यावेळी बारमध्ये बसलेले दोन जण जखमी झाले. तर पवनी शहरातील वीज पुरवठाही खंडीत झाला होता.

Web Title: And the sandy tip of the bar is in the bar