अन् अधिकारी न चुकता झाले सभेला हजर
By Admin | Updated: November 13, 2014 22:57 IST2014-11-13T22:57:05+5:302014-11-13T22:57:05+5:30
येथील पंचायत समितीच्या सभागृहात दर महिन्याला घेण्यात येणाऱ्या मासीक सभेत अनके विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांची वारंवार गैरहजर राहत असल्याने जनतेचे प्रश्न सोडविण्यास मोठी

अन् अधिकारी न चुकता झाले सभेला हजर
लाखांदूर : येथील पंचायत समितीच्या सभागृहात दर महिन्याला घेण्यात येणाऱ्या मासीक सभेत अनके विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांची वारंवार गैरहजर राहत असल्याने जनतेचे प्रश्न सोडविण्यास मोठी अडचण पदाधिकाऱ्यांमध्ये निर्माण होत होती. अखेर कारणे दाखवा नोटीस बजावल्याने सर्व विभागाचे अधिकारी न चुकता सभेला उपस्थित झाल्याने गैरहजर राहणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांवर उपसभापतीनी चपराक बसवली.
जिल्हा परिषदेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना, विकास कामाचे नियोजन, उपलब्ध झालेला निधी या व इतर अनेक महत्वपूर्ण विकास कामासंदर्भात निर्णय घेण्यासाठी तालुकास्तरावर पंचायत समितीच्या मासिक सभेत ठराव मंजूर केला जातो. यासाठी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना ७ दिवसांपूर्वी सदर मासिक सभेला हजर राहण्यासंदर्भात सूचना वजा पत्रक पाठविल्या जाते.
परंतु मागील अनेक वर्षापूर्वीचा निकाल बघता कोणत्याच विभागाचे अधिकारी कर्तव्यात कसूर करून हेतूपुरस्सर मासिक सभेला हजर राहण्याचे टाळत होते. त्यामुळे सर्व सामान्यांच्या प्रश्नाला किंवा फायद्याच्या योजनांना न्याय मिळत नव्हता. त्यामुळे अनेकदा मासीक सभा तहकुब करण्याची वेळ खंडविकास अधिकाऱ्यांवर आली होती.
यात बदल व्हावा जनतेला न्याय देण्याची तत्परता दाखवत येथील पंचायत समितीच्या उपसभापतींना अखेर दि. १९ आॅक्टोबर रोजीची मासीक सभा अधिकाऱ्यांच्या सततच्या गैरहजेरीमुळे तहकुब केली व दि. ७ नोव्हेंबरच्या स्थगित सभा घेण्यासंदर्भात सूचना केल्या. तत्पूर्वी अनेक अधिकाऱ्यांना सूचना व स्मरणपत्र तसेच कारणे दाखवा नोटीस बजावून न चुकता पुढील मासीक सभेला हजर राहण्याचे आदेश पत्र देण्यात आले.
यात सतत गैरहजर राहणारे जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय भंडारा, अधीक्षक अभियंता विद्युत विभाग भंडारा, मुख्य आगार प्रमुख महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भंडारा, उपविभागीय अभियंता इटियाडोह विभाग अर्जुनी (मोरगाव), उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद उपविभाग लाखांदूर, उप. अभि. लघुपाटबंधारे जिल्हा परिषद उपविभाग साकोली, उपविभागीय अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग पवनी, बालविकास प्रकल्प अधिकारी लाखांदूर यांना पुढील सभेत उपस्थित राहण्याचे आदेश पत्र सादर करण्यात आले.
विस्तार अधिकारी एम. ई. कोमलवार यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. हे सर्व अधिकारी कधीच पंचायत समितीच्या मासीक सभेला हजर राहत नसल्याने आदेश पत्र मिळताच दि. ७ नोव्हेंबरच्या मासिक सभेला हजर झाले. त्यामुळे सभा योग्य पद्धतीने पार पडली. अनेक प्रश्न निकाली निघाले. सर्व विभागाच्या योजनांची माहिती मिळाली. नागरिकांच्या समस्यांना न्याय मिळाला. त्यामुळे अशा पदाधिकऱ्यांची समाजाला गरज असल्याचे बोलले जात आहे. (तालुका प्रतिनिधी)