अन् ग्रामसभेचा ठराव झाला बेपत्ता
By Admin | Updated: September 6, 2014 23:32 IST2014-09-06T23:32:44+5:302014-09-06T23:32:44+5:30
मानेगाव बोरगाव येथील रोजगार सेवकाच्या मनमानी कारभाराने १५ आॅगस्टच्या ग्रामसभेत त्याला बदलण्याचा ठराव घेण्यात आला. मात्र हा ठराव बेपत्ता झाल्याची तक्रार आहे. याबाबत कारवाई करण्यास

अन् ग्रामसभेचा ठराव झाला बेपत्ता
बारव्हा : मानेगाव बोरगाव येथील रोजगार सेवकाच्या मनमानी कारभाराने १५ आॅगस्टच्या ग्रामसभेत त्याला बदलण्याचा ठराव घेण्यात आला. मात्र हा ठराव बेपत्ता झाल्याची तक्रार आहे. याबाबत कारवाई करण्यास संबंधित अधिकारी विलंब करीत असल्याने गावकऱ्यांत असंतोष निर्माण झाला आहे.
लाखांदूर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या मानेगाव बोरगाव गटग्रामपंचायत असून ग्रामसेवक चुटे हे कार्यभार सांभाळत आहेत. दि.१५ आॅगस्टला दोन्ही गावामध्ये झालेल्या ग्रामसभेपैकी मानेगाव येथे सचिवाचे काम जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक सय्याम यांनी पाहिले. ग्रामसभेत विविध विषयावर चर्चा झाली. वादग्रस्त रोजगार सेवक यांच्या बदली संदर्भाने ठराव घेण्यात आला. गावकऱ्यांनी याबाबत ठराव घेवून ग्रामरोजगार सेवकाला कामावरून कमी करण्याचा ठराव घेतला. ग्रामसभेचा समारोप झाल्यानंतर ठरावावर स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या. नंतर ग्रामपंचायतीत ग्रामसेवकाला ठराव सोपविण्यात आला. सरपंच सविता भेंडारकर यांना विचारणा केली असता त्यांनी मी ग्रामपंचायतीत ठराव वाचला होता मात्र दुसऱ्या दिवशी तो कागद गहाळ झाला. त्यामुळे ठराव अंदाजाने मुख्य ठराव पुस्तिकेत लिहण्यात आला. मात्र त्यात ग्रामरोजगार सेवकाच्या बदली संदर्भातील मुद्यांचा समावेश नाही, असे त्यांनी सांगितले.
परंतु, ग्रामसभेत सचिव सयाम यांनी लिहलेला ठरावाचा कागद गहाळ झाला कसा, असा प्रश्न आहे. हा प्रकार हेतुपुरस्परपणे केल्याचा अध्यक्ष रंगारी व स्थानिक ग्रामस्थांचा आरोप असला तरी त्याच्या विरोधात अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.
त्यामुळे हे प्रकरण चिघळण्याची शक्यता आहे. पंचायत समितीच्या संबंधित विभागाने सचिव व ग्रामरोजगार सेवक यांची चौकशी करून न्याय द्यावा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे. (वार्ताहर)