अन् शेतकºयांनी केली कोरड्या शेतात रोवणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 21:35 IST2017-07-30T21:35:08+5:302017-07-30T21:35:56+5:30

येथील शेतकरी अशोक सोमाजी शहारे यांनी शेतात पाण्याची व्यवस्था नसल्याने हलक्या धानाचे पºहे टाकले होते.

ana-saetakaoyaannai-kaelai-kaoradayaa-saetaata-raovanai | अन् शेतकºयांनी केली कोरड्या शेतात रोवणी

अन् शेतकºयांनी केली कोरड्या शेतात रोवणी

ठळक मुद्देपाऊस बरसेना चिंता संपेना : करडी परिसरातील पहिला धाडसी प्रयोग

युवराज गोमासे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
करडी (पालोरा) : येथील शेतकरी अशोक सोमाजी शहारे यांनी शेतात पाण्याची व्यवस्था नसल्याने हलक्या धानाचे पºहे टाकले होते. मात्र, पºयांना ३० दिवसांचा कालावधी लोटला असतांना रोवणी लायक पाणी आले नाही. त्यामुळे वाळलेल्या नर्सरीतून रोपे काढून चिखलणी न करता वाफसा स्थितीमधील जमिनीवर शेततण विरहित करुन दोरीच्या सहायाने भात रोपांची लागवड केली. हा करडी परिसरातील पहिला धाडसी प्रयोग असून परिणामाकडे शेतकºयांचे व कृषी विभागाचे लक्ष लागले आहे.
करडी परिसर कोरडवाहू क्षेत्रात मोडतो. सिंचनाच्या कोणत्याही सुविधा या भागात नाहीत. निसर्गावर येथील शेती अवलंबून आहे. परिसरात लहान मोठ्या तलावांची संख्या बरीच असतांना तलावांची सिंचन क्षमता बेताची आहे. विहिरीच्या पाण्याची पातळी खालावलेली असते. यावर्षी मोहाडी तालुक्यात १ जुन ते २९ जुलैपर्यंत पडलेल्या पावसाची सरासरी ७२ टक्के आहे. त्यातच वरठी १०२ टक्के, करडी ४८ टक्के, कांद्री ५१ टक्के, कान्हळगाव ४० आंधळगाव ६३ टक्के आहे. परिणामी अजुनही तलावात पाण्याचा ठणठणाट आहे. नाले पाण्याविणा कोरडी आहेत. शेतकºयांच्या शेतबोळीत, शेततळ्यात पाहिजे तसा पाण्याचा साठा निर्माण झालेला नाही.
करडी परिसरात यावर्षी आठवड्या अगोदर या हंगामातील पहिला मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे निसर्गावर अवलंबून असलेल्या शेतकºयांनी कशीबशी रोवणी सुरु केली असतांना पाऊस बेपत्ता झाला. त्यामुळे रोवण्या मोठ्या प्रमाणात खोळंबल्या आहेत. शेतकरी पावसाच्या प्रतिक्षत असतांना रोपांचा कालावधी महिना दिड महिन्यांवर आला आहे. शेतकºयांना कोरड्या दुष्काळाच्या चिंता सतावत आहे. शहारे यांची फक्त अर्धा एकर कोरडवाहू शेती करडी ते पालोरा मार्गावर विद्युत उपकेंद्राच्या समोर रस्त्याला लागून आहे. यांनी यावर्षी हलक्या धानाची पºहे टाकली. पºहांना कालावधी महिन्याभराचा झालेला असतांना शेती रोवायची कशी याची चिंता सतावीत असताना कोरड्या निसर्गाला न घाबरता शेतीत रोवणा करण्याचा धाडसी निर्णय घेतला. २८ जुलै रोजी त्यांनी ओल्या असलेल्या शेतीतील पºहे काढले. शेतात पाणी नसल्याने त्यांनी चिखलनीच्या भानगडी न करता रोपे जमिनीत गाडण्यासाठी नागरडी केली. शेत तणविरहित केले. चरे पडलेल्या खोलगट भागात धान पिकांची रोपे दोरी लावून रोवली. करडीचे कृषी पर्यवेक्षक निमचंद्र चांदेवार यांनी शेतावर जावून प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच रोपांची मुळे जमिनीत गाडण्याचा सल्ला दिला. प्रयोगाचे कौतुक होत असून पाऊस लांबणीवर पडल्याने हा प्रयोग यशस्वी होणार काय, याकडे शेतकरी व कृषी विभागाच्या नजरा लागल्या आहेत.

Web Title: ana-saetakaoyaannai-kaelai-kaoradayaa-saetaata-raovanai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.