शहरं
Join us  
Trending Stories
1
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
2
India Still Qualify For Semifinals : टीम इंडियासाठी कसं आहे सेमीचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर
3
बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान
4
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
5
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
8
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
9
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
10
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
11
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
12
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
13
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
14
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
15
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
16
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
17
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
18
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
19
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
20
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!

भलतंच! साधा मोबाईल वापरणाऱ्या वृद्धाला आले अश्लील फोटो पाठवल्याचे समन्स; प्रकरण पोहचले ठाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2022 19:29 IST

Bhandara News लाखांदूर येथील एका वृद्धाला मोबाईलवर अश्लील फोटाे पाठविल्याचा समन्स अमरावती जिल्ह्यातून पोस्टाने आला. हा समन्स पाहून वृद्ध चक्रावून गेला. आपल्याकडे साधा मोबाईल. त्यात ना व्हॉट्स् ॲप, ना फेसबुक मग असे कसे झाले.

ठळक मुद्देमोबाईल हॅकचा संशय 

भंडारा : स्मार्ट मोबाईल फोनवर अश्लील फोटो पाठविण्याचे प्रकार नवीन नाही. अशा प्रकरणात अनेकांवर गुन्हेही दाखल झाले आहेत. मात्र लाखांदूर येथील एका वृद्धाला मोबाईलवर अश्लील फोटाे पाठविल्याचा समन्स अमरावती जिल्ह्यातून पोस्टाने आला. हा समन्स पाहून वृद्ध चक्रावून गेला. आपल्याकडे साधा मोबाईल. त्यात ना व्हॉट्स् ॲप, ना फेसबुक मग असे कसे झाले. त्यांनी चिंताग्रस्त अवस्थेत लाखांदूर ठाणे गाठले. सर्व प्रकार सांगितला. वृद्धाकडे पाहून त्याच्या बोलण्यावर पोलिसांचा विश्वास बसला आणि तक्रार स्वीकारली. वृद्धाचा मोबाईल कुणी तरी हॅक करून हा प्रकार केला असावा असा संशय आहे.

मनोहर वासुदेव दिवठे (६२, रा. लाखांदूर) असे वृद्धाचे नाव आहे. त्यांनी दोन वर्षांपूर्वी साधा मोबाईल खरेदी केला होता. या मोबाईलमध्ये सीम कार्ड टाकून त्याच नंबरचा ते नियमित वापर करीत आहेत. सोमवारी पोस्टातून त्यांना मोबाईलवर समन्स आला. त्यात अमरावती जिल्ह्यातील एका महिलेला अश्लील फोटो पाठविल्याचा गुन्हा दाखल असल्याचे नमूद होते. हा समन्स पाहताच मनोहर अचंबित झाले. अमरावती सायबर पोलिसांनी त्या महिलेच्या तक्रारीवरून मोबाईल नंबरच्या आधारावर लोकेशन शोधले आणि विविध कलमान्वये त्यांच्यावर गुन्हा दाखल केला असल्याचा समन्स पाठविला.

या प्रकाराने व्यथित होत मनोहर दिवठे यांनी मंगळवारी लाखांदूर ठाणे गाठले. आलेला समन्स दाखवित आपल्याकडील मोबाईल पोलिसांपुढे ठेवला. हा प्रकार पाहून क्षणभर पोलीसही चक्रावले. काय प्रकार आहे याची शहानिशा सुरू झाली. त्यावेळी अज्ञात हॅकरने त्यांचा मोबाइल नंबर हॅक केला असावा असा कयास पुढे आला. मनोहर यांच्या मोबाईल नंबरचा वापर करून अज्ञाताने त्या महिलेला अश्लील फोटो पाठविले. हा प्रकार अमरावती जिल्ह्यातील रहाटगाव येथील महिलेसोबत घडल्याचे पुढे आले. तिने तक्रार दिली आणि इकडे मनोहर यांना समन्स आला. आता लाखांदूर ठाण्यात मनोहर दिवठे यांनीही तक्रार दिली. तपास लाखांदूरचे ठाणेदार रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनात केला जात आहे. या प्रकाराने वृद्धाला मात्र चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे.

टॅग्स :MobileमोबाइलSocialसामाजिकJara hatkeजरा हटके