शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

आंबेडकरी समाज जागृती संमेलन लवकरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 23:32 IST

आंबेडकरी बांधवांच्या विविध प्रश्नांवर विचारविनिमय करुन निर्णय घेण्याकरिता भंडारा येथे आंबेडकरी समाजबांधवांची सभा आयोजित करण्यात आली.

ठळक मुद्देसर्वानुमते निर्णय : आंबेडकरी समाज बांधवांची सभा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : आंबेडकरी बांधवांच्या विविध प्रश्नांवर विचारविनिमय करुन निर्णय घेण्याकरिता भंडारा येथे आंबेडकरी समाजबांधवांची सभा आयोजित करण्यात आली. सभेत प्रश्नांची सोडवणूक झाली नाही तर आॅक्टोबर शेवटच्या आठवड्यात भंडारा येथे जिल्हास्तरीय आंबेडकरी समाजजागृती संमेलन आयोजित करुन मागण्या मंजूर करुन घेण्याचा निर्णय घेण्यात आला.दलित मित्र समाज भूषण, सामाजिक कार्यकर्ते, विविध सामाजिक धार्मिक, राजकीय, शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्रातील तसेच मागासवर्गीय कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी व प्रतिनिधींच्या शेकडोची उपस्थिती असलेली ही संयुक्त सभा भंडारा येथील म्हाडा कॉलनीतील रामटेके सभागृहात माजी नगराध्यक्ष महेंद्र गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी तुमसरचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमचे जयप्रकाश भवसागर, भंडाराचे अमृत बन्सोड, प्रेमसागर गणवीर, डी. एफ. कोचे, म. दा. भोवते, रत्नमाला वैद्ये, रामचंद्र अंबादे, प्रेम सूर्यवंशी, बाळकृष्ण शेंडे, डी. व्ही. बारमाटे, इंजि. रुपचंद रामटेके, ज्ञानेश्वर गजभिये, एम. डब्ल्यू दहिवले, महादेव मेश्राम, डॉ. डी. आय. शहारे, गुलशन गजभिये, हिवराज उके, आर. ए. चिमणकर, बालकदास खोब्रागडे, असित बागडे, एम. आर. राऊत, प्रा. डॉ. के एल. देशपांडे, सारिका उके, पी. के. ठवरे, संजय बन्सोड, राहुल डोंगरे, मोरेश्वर बोरकर, अरुण गोंडाणे, प्रभाकर भोयर, डॉ. सुनील जीवनतारे, डॉ. भैयालाल गजभिये, आशु गोंडाणे, राजेश बौध्द, लक्ष्मीकांत तागडे, माया उके, डी. डी. रंगारी, करण रामटेके, सुरेश सतदेवे, अजय गडकरी, अजय तांबे, महेंद्र वहाणे, एम. एस. मेश्राम, नरेंद्र बन्सोड, विनोद रामटेके, शीलदीप गजभिये, यशवंत उपरीकर, सिध्दार्थ गजभिये, आहुजा डोंगरे आदी उपस्थित होते.सरकारी व निमसरकारी इत्यादी नोकºयातील खुल्या जागेवर एससी, एनटी, ओबीसीच्या उमेदवारांना बंदी, या संवर्गातील कर्मचारी अधिकाºयांचे पदोन्नतीतील आरक्षण अवैध ठरविणे या गुजरात व मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुध्द मुदतीत पुनर्विचार याचिका/अपील दाखल करण्यास शासनास बाध्य करणे, अभियांत्रिकी, वैद्यकीय, व्यवसायीक आदी अभ्यासक्रमासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून प्रवेशाच्या वेळी सक्तीने फी वसुल करणाºया शिक्षण संस्थावर दंडात्मक व कडक कार्यवाही करणे, कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलीडीटीच्या जाचक अटी रद्द करुन त्या मुदतीत मिळणे, युपीएससी व तत्सम परीक्षेत उत्तीर्ण होऊनही केंद्र सरकारच्या अनुसूचित जातीच्या यादीत बौध्दाचा समावेश नसल्याचे तांत्रिक कारण दर्शवून बुद्धिष्ट उमेदवारांची नियुक्ती न करणे किंवा केलेली नियुक्ती रद्द करण्यात येत असल्यामुळे केंद्र सरकारच्या अनुसूचित जातीच्या यादीत क्रमांक ६० वर बौध्द / नवबौध्द असे नमूद करणे, मागासवर्गीयांचा नोकºयातील लाखोंचा अनुशेष भरणे, खाजगी क्षेत्रात नोकºयात आरक्षण लागु करणे, वैद्यकीय अभ्यासक्रमात मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्राशिवाय हमीपत्रावर मिळालेल्या प्रवेशात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीवर सरकारने पुनर्विचार याचिका दाखल करणे, प्रलंबित बुद्धिष्ट पर्सनल लॉ मंजूर करणे, पवनी येथील उत्खननात सापडलेल्या अवशेषांचे जतन करुन उर्वरित दोन स्थळांचे उत्खनन करणे, भंडारा येथील १९५४ च्या पोट निवडणुकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य असलेल्या तत्कालीन कोलते यांच्या व आताच्या अशोक ले लँडच्या रेस्टहाऊस या ऐतिहासिक स्थळाला बाबासाहेबांचे स्मारक म्हणून घोषित करणे आदी ज्वलंत प्रश्नावर विचारविनिमय करुन निर्णय घेण्याकरिता सभेचे आयोजन करण्यात आले होते.सभेत जिल्हास्तरीय आंबेडकरी समाजजागृती संमेलन आयोजित करण्यचा निर्णय घेण्यात आला. हे आबेडकरी समाजजागृती संमेलन दिवसभराचे राहणार असून सकाळच्या उद्घाटनाच्या सत्रानंतर चार ज्वलंत विषयावर चार तज्ञांचे चर्चासत्र होणार आहे. त्यात माजी न्यायाधीश अनिल वैद्य, माजी न्यायाधीश कोळसे पाटील, न्यायमुर्ती सी. एल. थुल, घटनातज्ञ प्रा. देवीदास घोडेस्वार यांना आमंत्रित करण्याचे ठरविण्यात आले आहे. याकरिता एक समिती गठित करण्यात आली आहे.प्रास्ताविक व संचालन संयोजक अमृत बन्सोड यांनी केले. आभार असित बागडे यांनी मानले.