आंबेडकरी विचारांना जातवर्गच्या सीमारेषा नाहीत
By Admin | Updated: July 3, 2016 00:25 IST2016-07-03T00:25:47+5:302016-07-03T00:25:47+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अखिल मानव जातीचे प्रेरणादाते होते. त्यांच्या समाजक्रांती विचाराला कुठल्याही जात वर्ग समुहाच्या सीमारेषा नाहीत.

आंबेडकरी विचारांना जातवर्गच्या सीमारेषा नाहीत
नंदपुरे यांचे प्रतिपादन : डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय आणि राष्ट्रवाद व्याख्यान
भंडारा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अखिल मानव जातीचे प्रेरणादाते होते. त्यांच्या समाजक्रांती विचाराला कुठल्याही जात वर्ग समुहाच्या सीमारेषा नाहीत. बाबासाहेब हे येणाऱ्या अनेक पिढ्यांचेही 'आयकॉन' आदर्श ठरणार आहेत, असे प्रतिपादन साहित्य संशोधक डॉ. ईश्वर नंदपुरे यांनी केले.
विदर्भ साहित्य संघ शाखा भंडारा आणि सार्वजनिक वाचनालय भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय आणि राष्ट्रवाद या विषयावरील व्याख्यानात डॉ. ईश्वर नंदपुरे बोलत होते. अस्मितादर्श कार डॉ. गंगाधर पानतावने यांच्या ऐंशीव्या वाढदिवसानिमित्त आयोजिलेल्या व्याख्यानाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ताराचंद ठवकर हे होते. प्रमुख अतिथी म्हणून कादंबरीकार अ.शी. रंगारी तसेच विसासंचे अध्यक्ष डॉ. गुरूप्रसाद पाखमोडे, प्रदीप गादेवार आणि नंदपुरे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. गंगाधर पानतावणे यांच्या अभिनंदनाचा ठराव सर्वानुमते पारित करण्यात आला. यावेळी डॉ. ईश्वर नंदपुरे यांचा शाल, पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. अतिथी अ.शि. रंगारी यांनी अस्मितादर्श प्रैमासिकाच्या प्रदीर्घ वाटचालीचा मागोवा घेतला. डॉ. नंदपुरे आपल्या भाषणात म्हणाले आंबेडकरी समाज ही संकल्पना विशिष्ट जातीपुरती मर्यादित नसून ती संकल्पना बहुजन समाजाच्या सर्वस्तरापर्यंत विस्तृत केली पाहिजे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. गुरूप्रसाद पाखमोडे यांनी तर संचालन हर्षल मेश्राम यांनी केले. आभार प्रदर्शन प्रमोदकुमार अणेराव यांनी केले. कार्यक्रमासाठी विदर्भ साहित्य संघ आणि सार्वजनिक वाचनालय या संस्थांच्या कार्यकारी मंडळाच्या सदस्यांनी आणि कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी)