खेळाडूवृत्तीने सर्वांगीण विकास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 22:27 IST2018-11-02T22:26:50+5:302018-11-02T22:27:35+5:30
कर्तव्यावर असतांना शरीर व मन एकाग्र असणे आवश्यक आहे. यासाठी दैनिक खेळ खेळणे आवश्यक आहे. बुध्दी तल्लीन होते. शरीर सुदृढ राहतो. यासाठी स्पर्धेत सहभागी होऊन खेडाळूवृत्ती जपावी. यामुळे आपला सर्वांगीण विकास होतो, असे प्रतिपादन आयुध निर्माणीचे मुख्य महाप्रबंधक ए. षणमुगम यांनी केले.

खेळाडूवृत्तीने सर्वांगीण विकास
लोकमत न्यूज नेटवर्क
जवाहरनगर : कर्तव्यावर असतांना शरीर व मन एकाग्र असणे आवश्यक आहे. यासाठी दैनिक खेळ खेळणे आवश्यक आहे. बुध्दी तल्लीन होते. शरीर सुदृढ राहतो. यासाठी स्पर्धेत सहभागी होऊन खेडाळूवृत्ती जपावी. यामुळे आपला सर्वांगीण विकास होतो, असे प्रतिपादन आयुध निर्माणीचे मुख्य महाप्रबंधक ए. षणमुगम यांनी केले.
अखिल भारतीय आयुध व आयुध उपस्कर निर्माणी व स्पोर्ट्स क्लब आयुध निर्माणी भंडारा द्वारे बहुउद्देशिय सभागृह जवाहरनगर येथे आंतरक्षेत्रीय बुध्दीबळ स्पर्धेचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी अप्पर महाप्रबंधक एस. पी. शेंदरे, अप्पर महाप्रबंधक राजकुमार, ज्येष्ठ वैज्ञानिक रामटेके, अप्पर महाप्रबंधक हरिशकुमार, कर्णल एस. शिवाजी, क्रीडा अधिकारी आर. के. बिसनोई, क्रीडा सचिव एस. एस. नागदेवे, आंतरराष्ट्रीय बुध्दीबळ पंच एस. बलरामण उपस्थित होते. एस. बलरामण म्हणाले, खेळाडूंनी बुध्दीबळ स्पर्धेचे नियम काटेकोरपणे पाळावे. शांत व एकाग्र मनाने स्पर्धा खेळावी, शेवटी यश नक्की पदरात पडेल. याप्रसंगी आंतरराष्ट्रीय पंच यांनी स्पर्धेचे नियम वाचुन दाखविली. महाप्रबधक षणमुगम व एस. पी. शेंदरे यांनी बुध्दीबळ स्पर्धा खेळून स्पर्धेची सुरुवात केली. यात देशभ-यातील ४१ आयुध निर्माणी कारखान्यातील कर्मचारी, अधिकारी यांचे पाच झोन मध्ये विभागण्यात आले. मध्य, पुर्व, पश्चिम, उत्तर, दक्षीण विभागातील प्रत्येक चार खेळाडू व दोन अधिकारी सहभागी आहेत. एकूण दहा टेबल मध्ये जागतीक बुध्दीबळ स्पर्धा नियमानुसार खेळविले जात आहे. सदर स्पर्धा ही गुरुवारपासून तीन दिवस मध्य विभागात आयुध निर्माणी भंडारा येथील बहुउद्देशिय सभागृहात खेळविले जात आहे. संचालन विवेक पाठक यांनी केले.