तुमसरात अखिल भारतीय कवी संमेलन

By Admin | Updated: September 28, 2016 00:38 IST2016-09-28T00:38:43+5:302016-09-28T00:38:43+5:30

विश्व हिंदी दिवसानिमित्त सहयोग सहकारी पतसंस्था तुमसर व तुमसर साहित्य संघ यांच्या संयुक्त विद्यमाने अग्रसेन भवनात अखिल भारतीय कवी संमेलन आयोजित करण्यात आले होते.

All-India Indian Poet Sammelan | तुमसरात अखिल भारतीय कवी संमेलन

तुमसरात अखिल भारतीय कवी संमेलन

श्रोत्यांची उपस्थिती : तुमसरकरांना मनोरंजनात्मक कवितांची मेजवानी
तुमसर : विश्व हिंदी दिवसानिमित्त सहयोग सहकारी पतसंस्था तुमसर व तुमसर साहित्य संघ यांच्या संयुक्त विद्यमाने अग्रसेन भवनात अखिल भारतीय कवी संमेलन आयोजित करण्यात आले होते.
कवी संमेलनाचे उद्घाटन आ. चरण वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले. अतिथी म्हणून प्रदीप पडोळे, अरुण लांजेवार, आनंद जायस्वाल, अमित चौधरी, मुकेश थानथराटे उपस्थित होते.
कवी संमेलनात प्रसिद्ध कवी किरण जोशी (अमरावती), राम खिलाडी स्वदेशी (मुथुरा), कवयित्री रचना गोस्वामी (मुंबई), नरेंद्र बंजारा, प्रा.सय्यद कय्युम, युसुफ सागर (भिलाई), काव्य जनाब हैदरभाई, कुदरत अली , प्रमोद शाहू (तुमसर), यांनी काव्य वाचन केले.
यावेळी डॉ.अनंत बागडे यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा सहयोग गौरव पुरस्कार देवून सत्कार करण्यात आला. सुमारे चार तास कवी संमेलनाची मेजवानी तुमसरकरांनी अनुभवली.
संचालन डॉ.युवराज जमईवार, प्रास्ताविक सहयोग पतसंस्थेचे अध्यक्ष मो.तारिक कुरैशी तर आभार कैलास पडोळे यांनी मानले. कवी संमेलनाकरिता संचालक रमेश निखाडे, तुकाराम कोरडे, सुभाष मार्जीवे, विजय पारधी, मालती आगाशे, लक्ष्मी इळपाचे, मुख्य व्यवस्थापक विनोद धांडे, ललीत बावनकर, समीर पवार, अजय पालवे, प्रमोद ठाकरे, धनश्री जोशी, मोरेश्वर मस्के, विनायक सहारे, सुरेश क्षीरसागर यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: All-India Indian Poet Sammelan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.