तुमसरात एटीएम झाले ‘कॅशलेस’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 23:00 IST2018-03-31T23:00:54+5:302018-03-31T23:00:54+5:30

बँकेत रांगा लागू नये व खातेदारांना चालती फिरती बँकेची सोय म्हणून एटीएम सुरू करण्यात आले, परंतु तुमसरात एटीएमसमोर कॅशलेशचा फलक बँकानी लावला आहे.

All the ATMs are 'cashless' | तुमसरात एटीएम झाले ‘कॅशलेस’

तुमसरात एटीएम झाले ‘कॅशलेस’

ठळक मुद्देखातेदारांना मन:स्ताप : एटीएममध्ये रोख रक्कम भरण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : बँकेत रांगा लागू नये व खातेदारांना चालती फिरती बँकेची सोय म्हणून एटीएम सुरू करण्यात आले, परंतु तुमसरात एटीएमसमोर कॅशलेशचा फलक बँकानी लावला आहे. मागील दोन दिवसापासून एटीएममध्ये रोख रक्कमेचा ठणठणाट आहे. खातेदारांना येथे मन:स्ताप करावा लागत असून बँक प्रशासनाने किमान एटीएममध्ये रोख रक्कम भरावी, अशी मागणी केली जात आहे.
मार्च अखेरची घाई सर्वांनाच असून आर्थिक वर्ष एप्रिलमध्ये सुरू होत आहे. सलग सुट्या आल्याने बँकेने तत्पूर्वी एटीएममध्ये रोख रक्कम भरली. खातेदारांनी मोठ्या संख्येने एटीएममधून रक्कम काढली. एक ते दीड दिवसात एटीएम रिकामे झाले. तुमसर शहरात सर्वच बँकाच्या एटीएम समोर कॅशलेशचा फलक लावण्यात आला आहे.
बँकेला सुट्या असल्याने खातेदारांनी एटीएमचा वापर मोठ्या प्रमाणात केला. अनेकांना रिकाम्या हाताने परतावे लागले. आता बँक सुरू झाल्यावरच खातेदारांना रक्कम प्राप्त होईल, असे सध्या चित्र दिसत आहे.
शहरात व्यावसायीक तथा नोकरदार वर्ग मोठ्या संख्येने आहे. सुट्या असल्याने खरेदी व फिरायला जाणे असा बेत अनेकांनी आखला होता. परंतु त्यांच्या आनंदावर येथे विरजन पडले आहे. बँकेने नियोजन करण्याची गरज असल्याचे खातेदारांनी सांगितले. तांत्रिक युगात तात्कळत राहावे लागत असेल तर यापेक्षा एटीएमचा वापर कशाला करावा, अशा संतप्त प्रतिक्रिया खातेदारांनी व्यक्त केल्या.

मार्च अखेर असून बँकेचा व्यवहार बंद राहणार आहे, याची माहिती खातेदारांना होती. त्यामुळे वाजवीपेक्षा जास्त रक्कम खातेदारांनी काढली. याचा फटका दुसऱ्या खातेदारांना बसत आहे.
-नितीन सोनकुसरे, व्यवस्थापक, बँक आॅफ बडोदा, शाखा तुमसर.

Web Title: All the ATMs are 'cashless'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.