दीड महिन्यानंतर धावणार अकोला, अमरावती लांब पल्ल्याच्या बस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:43 IST2021-06-09T04:43:46+5:302021-06-09T04:43:46+5:30

फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट आली होती. त्यामुळे मार्च-एप्रिल महिन्यांत मृतांचा आकडा वाढल्याने प्रवासी संख्या घटली ...

Akola, Amravati long distance buses will run after a month and a half | दीड महिन्यानंतर धावणार अकोला, अमरावती लांब पल्ल्याच्या बस

दीड महिन्यानंतर धावणार अकोला, अमरावती लांब पल्ल्याच्या बस

फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट आली होती. त्यामुळे मार्च-एप्रिल महिन्यांत मृतांचा आकडा वाढल्याने प्रवासी संख्या घटली होती. मात्र, आता शेतकरी, कामगार, विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी टाळण्यासाठी तसेच परजिल्ह्यात परत गेलेल्या नागरिकांना परतण्यासाठी लांब पल्ल्याच्या एसटी बस सुरू करत असल्याची माहिती भंडारा आगार प्रमुखांनी दिली. त्यामुळे आता प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. सोमवार ७ जूनपासून दूर अंतरावरील बस भंडारा आगारातून धावायला सुरुवात झाली आहे. दरम्यान, प्रवास करताना प्रवाशांनी मास्कचा वापर करावा, असे सांगण्यात आले आहे.

बॉक्स

भंडारा आगारातून या मार्गावर धावणार बस

सकाळी ६.३० वाजता भंडारा-राजुरा, ११ वाजता साधी बस १३.३० ला शिवशाही बस भंडारा-अकोला, भंडारा-वाशिम १०. ३० वाजता, भंडारा - परतवाडा ७.३० वाजता, भंडारा - अमरावती ८.०० वाजता, भंडारा - गडचिरोली ७. ४५ वाजता, पवनी मार्गावर सकाळी ७ वाजेपासून दर ३० मिनिटांनी बस राहणार आहेत. नागपूर मार्गावर सकाळी ६ . ३० वाजेपासून दर १५ मिनिटांनी साधी बस व शिवशाही बस सुरू राहील. भंडारा - साकोली, तुमसर, रामटेक मार्गावर ७ वाजेपासून दर ३० मिनिटांनी तर ग्रामीण भागातील मुंढरी, लाखांदूर, मोरगाव अर्जुनी, आंभोरा, नवेगाव (राजोला) बस सुरू करण्यात आल्या असून, प्रवासी प्रतिसाद पाहूनच वेळेत बदल किंवा बस फेऱ्या कमी-जास्त करण्यात येणार आहेत.

कोट

प्रवाशांनी मास्क, सॅनिटायझर, फिजिकल डिस्टन्सिंग राखून एसटी बसने सुरक्षित प्रवास करून राज्य परिवहन महामंडळास सहकार्य करावे. अधिक माहितीसाठी भंडारा बसस्थानक प्रमुखांकडे चौकशी करावी.

फाल्गुन राखडे,

आगार व्यवस्थापक, भंडारा

Web Title: Akola, Amravati long distance buses will run after a month and a half

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.