शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक विविधतेसाठी अधिक पोषक होतेय वातावरण; हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली
2
बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
3
इलेक्शन ड्युटी टाळण्यासाठी पुरुष शिक्षकाने गर्भवती असल्याचे भासवले; अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले
4
आजचे राशीभविष्य - १० मे २०२४; इतर काही मार्गानी आर्थिक लाभ होतील, व्यवसायात प्रगती होईल
5
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
6
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
7
छपाई महाग; दहावी-बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ
8
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर
9
दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 
10
आजी, माजी गृहमंत्री एकाच हॉटेलात मुक्कामी पण...दोघेही म्हणतात आम्ही एकमेकांना भेटलो नाही
11
खासदारकीसाठी कुणाकुणाला भेटलात, दावोसच्या गुलाबी थंडी काय केले? प्रियंका चतुर्वेदींना शिंदे सेनेचा सवाल
12
द्वेष नव्हे तर नोकरी निवडा; 'इंडिया' येणार अन् ३० लाख नोकऱ्या देणार
13
या समोरासमोर अन् एकदा काय ती चर्चा होऊनच जाऊद्या! माजी न्यायाधीशांचे पंतप्रधान अन् राहुल गांधींना आमंत्रण
14
प्रचारात मोदी टॉपवर; आतापर्यंत ८३ सभा! प्रचार करण्यात विरोधक जवळपासही नाहीत
15
सत्ताधारी वायएसआर काँग्रेसला अँटी इन्कम्बन्सीची भीती; सर्व जमिनींची नोंद 'या' पक्षाला महागात पडणार?
16
डॉ. दाभोलकर हत्या खटल्याचा आज निकाल; घटनेला १० वर्षे, अडीच वर्षे चालली सुनावणी
17
विलीनीकरण नव्हे, एकत्र काम करणार! शरद पवारांनी दिला चर्चेला पूर्णविराम; 'इंडिया'ला महाराष्ट्रात प्रचंड समर्थन
18
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
19
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
20
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा

अन विमान प्रवासाने भारावली तुमसरची ‘श्रावी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 12:50 AM

पहिलाच विमान प्रवास असल्यामुळे अन्य विद्यार्थ्यांसारखी विमानात बसण्याची माझीही उत्सुकता वाढली होती. आम्ही नागपूर विमानतळावर पोहोचलो. अवघ्या दीड तासात दिल्लीला पोहोचलो. दिल्लीत विमानतळ पाहून अक्षरक्ष: भारावलो, हे सर्व ‘लोकमत’मुळे शक्य झाल्याची प्रतिक्रिया आहे श्रावी शिवशंकर बोरकर या विद्यार्थिनीची.

ठळक मुद्देलोकमत संस्कारांचे मोती स्पर्धा : दिल्लीत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांची घेतली भेट

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : पहिलाच विमान प्रवास असल्यामुळे अन्य विद्यार्थ्यांसारखी विमानात बसण्याची माझीही उत्सुकता वाढली होती. आम्ही नागपूर विमानतळावर पोहोचलो. अवघ्या दीड तासात दिल्लीला पोहोचलो. दिल्लीत विमानतळ पाहून अक्षरक्ष: भारावलो, हे सर्व ‘लोकमत’मुळे शक्य झाल्याची प्रतिक्रिया आहे श्रावी शिवशंकर बोरकर या विद्यार्थिनीची.लोकमत समूहातर्फे ‘संस्काराचे मोती’ स्पर्धेतील विजेत्या स्पर्धक विद्यार्थ्यांना नागपूर-दिल्ली-नागपूर अशी हवाई सफर करविण्यात आली. यात सहभागी होऊन परतल्यानंतर श्रावी बोरकर या विद्यार्थिनीने प्रवासाचे वर्णन कथन केले. मंगळवारला परत आल्यानंतर गुरूवारला सकाळी तिचा तुमसर येथील शारदा विद्यालयात लोकमत जिल्हा कार्यालयाच्यावतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य राजकुमार बालपांडे, प्रा.राहुल डोंगरे, कार्यालयप्रमुख मोहन धवड, वितरण अधिकारी विजय बन्सोड, तुमसरचे शहर प्रतिनिधी राहुल भुतांगे, तुमसरचे लोकमत वितरक संजीव थोटे व शिक्षकवृंद उपस्थित होते.नागपूर विभागातील ‘संस्काराचे मोती’ या स्पर्धेतील विजेते मंगळवारला सकाळी ७ वाजता नागपूरहून दिल्लीला विमान प्रवासाला निघाले. सर्वांचाच पहिला विमान प्रवास असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह होता. दीड तासाच्या हवाई प्रवासानंतर दिल्ली विमानतळावर आम्ही पोहोचलो. त्यानंतर काही वेळातच गोवा व महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांची एकत्र भेट झाली. येथे दोन्ही राज्यातील विद्यार्थी एकत्र भेटले. त्यानंतर देशाच्या राजधानी भेटीच्या प्रवासाला सुरूवात झाली. महामहिम उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, मानव संसाधन विकास राज्यमंत्री सत्यपाल सिंग, भाजपचे ज्येष्ठ नेते मुरलीमनोहर जोशी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन संवाद साधण्याची संधी मिळाली. इंडिया गेट, राष्ट्रपती भवन पाहण्याची संधी मिळाली.शालेय जीवनात कोणत्याही उपक्रमातून हवाई सफर घडविण्याची संधी उपलब्ध झाली नाही. तुम्ही भाग्यवान आहात. तुम्हाला ‘लोकमत’ समूहाने ही संधी उपलब्ध करून दिली, असे सांगत उपराष्ट्रपती नायडू यांनी ‘लोकमत’च्या उपक्रमाची मुक्तकंठाने प्रशंसा केली. ही सर्व अनुभूती आपल्याला स्वप्नवत वाटत होती, अशी प्रतिक्रिया श्रावी बोरकर या विद्यार्थिनीने दिली. परतीच्या प्रवासाला सुरूवात झाल्यानंतर दीड तासात विमान नागपूरला पोहोचले, असे श्रावीने सांगितले. लोकमत समूहातर्फे श्रावीला मिळालेल्या दिल्ली हवाई सफरीमुळे शाळेतील शिक्षकवृंद, विद्यार्थी व कुटुंबामध्ये आनंद व्यक्त होत आहे. ‘लोकमत’च्या उपक्रमामुळे श्रावीला विमान प्रवास करण्याची संधी मिळाली, असे भावोद्गार बोरकर कुटुंबीयांनी ‘लोकमत’शी बोलताना काढले.

टॅग्स :Lokmatलोकमत