‘त्या’ आरोपीकरिता पोलिसांना हवा वॉरंट

By Admin | Updated: October 2, 2015 05:38 IST2015-10-02T05:38:19+5:302015-10-02T05:38:19+5:30

तुमसरातील घरफोडी प्रकरणातील दोन महिला आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. पुन्हा त्या आरोपी महिलांनी

Air warrant to the police for the accused | ‘त्या’ आरोपीकरिता पोलिसांना हवा वॉरंट

‘त्या’ आरोपीकरिता पोलिसांना हवा वॉरंट

तुमसर : तुमसरातील घरफोडी प्रकरणातील दोन महिला आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. पुन्हा त्या आरोपी महिलांनी अन्य ठिकाणी केलेल्या चोरीच्या चौकशीसाठी तुमसर पोलिसांनी दिवाणी व फौजदारी न्यायालयात अर्ज करुन ‘प्रोड्यूस वॉरंटची’ मागणी केली आहे.
बुधवारी सकाळच्या सुमारास विनोबा भावे मार्गावर दोन महिला संशयास्पद स्थितीत फिरत होत्या. पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता त्या घाबरल्या. पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्यांनी दुर्गा नगरातील घरफोडी प्रकरणाची कबुली दिली. याप्रकरणी माधुरी गजानन पवार (२८) व शोभा कोचन्ना दांडेकर (२१) रा.हिंगणघाट, जि.वर्धा यांच्याविरुद्ध तुमसर पोलिसांनी भादंवि ४५४, ३८० कलमान्वये गुन्हा दाखल करुन अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता आरोपी महिलांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. शहरात मागील एक महिन्यांपासून घरफोडीचे सत्र सुरु आहे. पोलिसांना आरोपींचा सुगावा लागलेला नाही. बंद घरे फोडण्यात आली. यात काही महिलांचा समावेश असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. प्रत्येक चोरीत साधर्म्य दिसून आल्यामुळे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींचा अन्य घटनेत सहभाग असू शकतो कां? याची माहिती जाणून घेण्यासाठी न्यायालयात प्रोड्युस वॉरंटची मागणी केली आहे. आरोपी महिला दगडी पाटे टाचविण्याचे काम करीत असल्याचे भासवित होते. परंतु त्यांचा मुख्य व्यवसाय घरफोडी करणे होते, या निष्कर्षाप्रत तुमसर पोलीस पोहचले आहेत. (तालुका प्रतिनिधी)

घरफोडी प्रकरणात न्यायालयात चौकशीसाठी अर्ज केला आहे. आरोपी महिलांकडून अन्य घरफोडीचे धागेदोरे गवसण्याची शक्यता आहे.
- सुरेश हावरे
तपास अधिकारी, तुमसर.

Web Title: Air warrant to the police for the accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.