वाचन प्रेरणादिनी २५ लाख पुस्तक वाचनाचे उद्दिष्ट

By Admin | Updated: October 15, 2016 00:32 IST2016-10-15T00:32:46+5:302016-10-15T00:32:46+5:30

विद्यार्थ्यांना नियमित वाचनाची सवय व गोडी लागावी यादृष्टीने १५ आॅक्टोंबर हा डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन वाचन पे्ररणा दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे.

The aim of reading 2.5 million books | वाचन प्रेरणादिनी २५ लाख पुस्तक वाचनाचे उद्दिष्ट

वाचन प्रेरणादिनी २५ लाख पुस्तक वाचनाचे उद्दिष्ट

शनिवारी दुपार पाळीत शाळा : शाळांशाळांमधून प्रभात फेरीने होणार जनजागृती
मोहाडी : विद्यार्थ्यांना नियमित वाचनाची सवय व गोडी लागावी यादृष्टीने १५ आॅक्टोंबर हा डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन वाचन पे्ररणा दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी इयत्ता बारावीपर्यंत विद्यार्थ्यांनी छोटी पुस्तके वाचवित अशी अपेक्षा केली गेली आहे. यासाठी २५ लक्ष पुस्तकांच्या वाचनाचे उद्दिष्ट जिल्ह्यात निश्चित करण्यात आले आहे.
भारत देश कसा शक्तीशाली होईल. सकारात्मक विचार करुन भारतातील प्रत्येक व्यक्ती स्वत:ला कसे समृध्द करेल असा विचार डॉ. अब्दूल कलाम करीत होते. डॉ. अब्दूल कलामांचे स्वप्न साकार करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने त्यांचा जन्म दिवस प्रेरणा दिन साजरा करण्याचे मागील वर्षी परिपत्रक जारी केले आहे. विद्यार्थी शिक्षीत होताना सुसंस्कारित होणे गरजेचे आहे. वाचनामुळे मनावर संस्कार होतात. विचारांना चालना मिळते. चांगले काय यातील भेदाभेद स्पष्ट होतात. यामुळे विद्यार्थ्यांना वाचनास प्रवृत्त करणे काळाची गरज आहे. ही गरज ओळखून वाचन प्रेरणादिनी विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहेत.
वाचन प्रेरणा दिवसाचे निमित्त साधून डॉ. ए.पी.जे. अब्दूल कलाम वाचन कट्टा निर्माण केला जावा. समाज सहभागातून या कट््यासाठी पुस्तके गोळा करुन शाळेत पुस्तकपेढी तयार करावी. प्रत्येक विद्यार्थ्यांने एक पुस्तक वाचण्याचा संकल्प करावा. प्रत्येक शिक्षकाने आॅक्टोंबर अखेरपर्यंत डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी लिहलेल्या किमान एका पुस्तकाचे वाचन करावे. वाचन प्रेरणा ही चळवळ होण्याकरिता प्रत्येक व्यक्तीचे योगदान महत्वाचे राहणार आहे. यासाठी एक व्यक्ती एक पुस्तक भेट हा उपक्रम राबविला जाणार आहे.
प्रत्येक व्यक्तीने, शिक्षकांनी, माजी विद्यार्थी, पालकांनी एका विद्यार्थ्याला, शाळेला विद्यार्थ्यांच्या वयाला अनुरुप होतील अशी पुस्तके भेट द्यावीत. विद्यार्थ्यांना आनंदाने वाचन करण्यास देण्यासाठी वाचू आनंदे या तासिकेचे आयोजन करण्यात यावे. चर्चासत्र आयोजित करावे, परिसरातील लेखकरु कवींना विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी आमंत्रित करावे. पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात यावे, पुस्तकांचे वाटप करुन वाचन दिन व अध्यापक दिन साजरा करावा. शाळांनी पुढाकार घेवून पुस्तके तुमच्या भेटीला या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे. प्रत्येक शाळेतील तिसऱ्या इयत्ता ते बारावीपर्यंत प्रत्येक मुलवाचन प्रेरणा दिनी किमान १० छोटी पुस्तके वाचेल या बेताने मुलांना वाचन, वाचनाची गती व वाचनाची सवय शिकवावी.
वाचन प्रेरणा दिवशी सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, विविध विभागाचे अधिकारी, पर्यवेक्षक यंत्रणा जिल्हा शिक्षण , शिक्षणाधिकारी, गटसाधन केंद्र, समुह साधन केंद्र, शाळा व्यवस्थापन समिती युवक, पालक आदीनी शाळेत जावून मुलांसोबत पुस्तकांचे वाचन करण्याचे नियोजन व भेटी देण्याचे नियोजन करण्यात आले. (प्रतिनिधी)े

ई-लर्निंग पुस्ताकंचे ही वाचन केले जाईल, मुलांना पटेल, रुचेल असे द्विभाषिक पुस्तकांची खरेदी जि.प. च्या शाळांनी केली. यावर्षी जि.प. च्या ३५४ शाळांना ४० लक्ष रुपयांचा निधी पुस्तक खरेदीसाठी तीन महिनेपूर्वी करण्यात आला. या दिनाचा लाभ प्रत्येक विद्यार्थ्यांनी घेतला तर वाचन विद्यार्थ्यांच्या जीवनात समृध्दी आणू शकेल.
- अभय परिहार, प्राचार्य
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, भंडारा

Web Title: The aim of reading 2.5 million books

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.