अहल्याबार्इंचे जीवनकार्य प्रेरणादायी
By Admin | Updated: August 28, 2015 01:06 IST2015-08-28T01:06:09+5:302015-08-28T01:06:09+5:30
अहल्याबाई होळकर यांचे चरित्र व साहसी जीवनकार्य भारतीय स्त्रियांना प्रेरणादायी आहे.

अहल्याबार्इंचे जीवनकार्य प्रेरणादायी
मदर तेरेसा जयंती : श्रीकांत नरिंगे यांचे प्रतिपादन
जवाहरनगर : अहल्याबाई होळकर यांचे चरित्र व साहसी जीवनकार्य भारतीय स्त्रियांना प्रेरणादायी आहे. सती न जाता राज्य कारभार सक्षमपणे सांभाळला. हातात तलवार घेऊन घोड्यावर स्वार झाली आणि पतीचे साम्राज्य टिकवून ठेवले. पुरोगामी विचार मनात ठेवून आत्मसन्मान वाढविला म्हणून त्या पुरोगामी भारतीय स्त्रीचे प्रतिक आहेत, असे प्रतिपादन श्रीकांत नरिंगे यांनी केले.
कला व वाणिज्य पदवी महाविद्यालयात पेट्रोलपंप जवाहरनगर येथील युजीसी दिल्ली द्वारा पुरस्कृत डॉ.बाबासाहेब आंबेडकर अभ्यास केंद्र यांच्या वतीने मदर तेरेसा जयंती व अहल्याबाई होळकर पुण्यतिथीनिमित्त प्रमुख मार्गदर्शन म्हणून श्रीकांत नरिंगे बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्था सचिव जी.डी. टेंभरे हे होते. यावेळी अरुणराव कलोडे महाविद्यालय नागपुरचे प्राचार्य डॉ.मनोहर नाईक, कवी दिपक रंगारी, प्राचार्य डॉ.अजयकुमार मोहबंशी, केंद्र समन्वयक प्रा.जगजीवन कोटांगले उपस्थित होते. डॉ.मनोहर नाईक म्हणाले, मदर तेरेसा यांचे मानवातावादी कार्य आधुनिक समाजसेवकांच्या इतिहासातील प्रमुख कार्य आहे. तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा मानवतावाद वर्तमान भारताला व भविष्याच्या भारत इतिहासाला नवी दृष्टी देणार आहे. कवी दिपक रंगारी यांनी माय ही त्यांची प्रसिद्ध कविता सादर केली. अध्यक्षीय भाषणात डॉ.जी.डी. टेंभरे म्हणाले, मदर तेरेसा आणि अहल्याबाई होळकर या अखंड भारताच्या प्रेरक आहेत. त्यांचे समाजकार्य भारत देशाला दिशादर्शक ठरावे असे आहेत. प्रासताविक केंद्र समन्वयक प्रा.जगजीवन कोटांगले यांनी केले. संचालन डॉ.नलीनी बोरकर यांनी केले.
आभार डॉ.रत्नपाल डोहणे यांनी मानले. यशस्वितेसाठी प्रा.देवराम डोरले, प्रा.एम.ए. रहांगडाले, डॉ.आर.टी. पटले, डॉ.ए.पी. वंजारी, डॉ.सी.पी. साखरवाडे, प्रा.एम.एस. नाकाडे, प्रा.एस.आर. गोंडाणे डॉ.साधना वाघाडे, प्रा.आर.पी. बावनकर, प्रा.आर.एम. मानकर, डॉ.रविदास व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)